धक्कादायक! मोहम्मद पैगंबर यांचं व्यंगचित्र विद्यार्थांना दाखवलं म्हणून शिक्षकाचा गळाच चिरला

शिक्षकाने विद्यार्थ्यांना पैगंबर मुहम्मद यांचं चित्र दाखवलं म्हणून शिक्षकाचं मुंडकं कापलं. यानंतर आरोपीने घोषणाबाजी करायला सुरुवात केली. पोलीस माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी पोलिसांना आरोपीने बंदूक दाखविली आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या. ही घटना पॅरिसमध्ये घडली आहे.

एका वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, इतिहास शिकवणाऱ्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र दाखवलं होतं. यामुळे आरोपीला राग आला होता. संतप्त झालेल्या आरोपीने चाकूने शिक्षकाचं मुंडकंच कापलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता आरोपी तिथे हजर होता. पोलीस येताच आरोपीने त्यांना बंदुकीचा धाक दाखवला. यामुळे पोलिसांनी गोळी मारत त्याला ठार केलं. पोलिसांनी आरोपीला आपले हात खाली करण्यास सांगितलं होतं. परंतु पोलिसांना शस्त्रे दाखवून तो घटनास्थळावरून पळाला. दूरवर पोहोचल्यावर त्या माणसाने पुन्हा बंदूक पोलिसांना दाखविली आणि आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. या दरम्यान पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या. आता यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, संशयिताकडे चाकू आणि बंदूक होती.

पॅरिसच्या वायव्य उपनगरात एका शिक्षकाचा शिरच्छेद केल्याच्या घटनेचा फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी निषेध केला आहे. अतिरेक्यांशी सामना करण्यासाठी त्वरित व ठोस कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिलं. हल्ल्याच्या काही तासांनी राष्ट्रपतींनी कॉन्फ्लॅन्स-सौ-होनोरी मिडल स्कूलला भेट दिली. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले, “आमच्यातील एका नागरिकाची आज हत्या झाली कारण तो विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिकवत होता.” खरं तर फ्रान्समध्ये प्रेषित मोहम्मदशी संबंधित वादात आतापर्यंत दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – माझे कुटुंब, माझी जबाबदारी: १ कोटींपेक्षा अधिक व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण