Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम ४१६ तळीरामांवर वाहतूक पोलिसांनी केली कारवाई, २०७ सहप्रवाश्यांवर आखला दंड

४१६ तळीरामांवर वाहतूक पोलिसांनी केली कारवाई, २०७ सहप्रवाश्यांवर आखला दंड

४१६ तळीरामांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून २०७ सहप्रवाश्यांवर दंड आखला आहे.

Related Story

- Advertisement -

वारंवार सूचना देऊनही थर्टीफर्स्टच्या रात्री मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्याची वाहतूक पोलिसांनी चांगलीच झिंग उतरवली. ठाणे वाहतूक विभागाने गुरुवारी मध्यरात्री मद्यप्राशन करून वाहन चालवणारे आणि त्याच्यासोबत असलेले सहप्रवासी अशा एकूण ६२३ जणांवर दंडात्मक कारवाईसह कोवीड १९ Act कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई ठाणे कल्याण, डोंबिवली भिवंडी आदी शहरात करण्यात आली असल्याची माहिती ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

संचारबंदीचे केले उल्लंघन

राज्य शासनाच्या आदेशानुसार ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणारे तसेच मद्यप्राशन करून बाहेर पडणाऱ्याना पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही अनेक जण संचारबंदीचा आदेश धुडकारून बाहेर पडले होते. कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये, तसेच अपघात होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली होती. त्यात ठाणे वाहतूक पोलिसांनी आपली कामगिरी चोख बाजावत ठाणे, मुंब्रा, कळवा, कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी आदी शहरात ड्रंक अँड ड्राईव्ह ही मोहीम राबववण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत वाहतूक पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी लावली होती. या दरम्यान वाहतूक शाखेकडून ३१ तारखेला आयुक्तालयाच्या हद्दित ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. त्यात प्रत्येक वाहन चालकांची कसून चौकशी करण्यात आली. संशयास्पद वाहनचालकांची ब्रेथ अँनालायझर्सच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली. वाहन चालकाने मद्य प्राशन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ही तपासणी करताना कोरोना संक्रमण होणार नाही यासाठी योग्य ती वाहतूक विभागाकडून खबरदारी घेण्यात आली होती.

६७ वाहनचालकांसह ४० सहप्रवाशांवर कारवाई

- Advertisement -

ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर या शहरांमध्ये झालेल्या या कारवाईत ४१६ मद्यपी वाहनचालकसह सोबत प्रवास करणाऱ्यांना २०७ मोटर वाहन कायद्याच्या कलम १८८ अन्वये दोषी ठरवून त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करता आली. त्यानुसार २०७ सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. नारपोली शाखेच्या हद्दित सर्वाधिक ६७ वाहनचालक आणि ४० सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याखालोखाल कोणगाव, डोंबिवली, उल्हासनगर या विभागांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी मद्यपी वाहनचालक राबोडी, ठाणे नगर आणि कोपरी या विभागात आढळले आहेत.


हेही वाचा – आठ वर्षांनी सापडला खूनी, नेपाळ भारत सीमेवरून केले अटक


- Advertisement -

 

- Advertisement -