भाऊबीजेच्या दिवशी दोन सख्ख्या बहिणींची कोयत्याने क्रुरपणे हत्या

भाऊबीजेच्या दिवशी गोव्यातील म्हापसा येथे दोन सख्ख्या बहिणींची कोयत्याने क्रुरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालमत्ता आणि घरगुती वादातून दोन सख्खा बहिणींची भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला हत्या करण्यात आलीआहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मार्ता लोबो (६४) आणि वीरा लोबो (६२) असे मृत महिलांची नावे आहेत.

ही घटना १५ नोव्हेंबरला रात्री ९.३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी रोविना लोबो (२९) आणि सुबहान राजाबली (२०) या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रोविना लोबो हिचे लग्न १० वर्षांपूर्वी ज्युलिओ रोबो याच्यासोबत झाले होते. हे दोघे पती-पत्नी मार्ता आणि वीरा (ज्युलिओची आत्या) यांच्यासोबत एकाच घरात राहत होते. एकत्र राहत असल्यामुळए अनेकदा रोविनाचे मार्ता आणि वीरासोबत खटके उडायचे. संपत्तीवरुन देखील यांच्यात वाद व्हायचे. रोविनाने त्या दोघांना ठार करण्याचे ठरवले. त्यासाठी रोविनाने एका सुपारी घेणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान तिची भेट सुबान राजबाली या मजुराशी झाली. पैशांसाठी राजाबली याने दुहेरी खुनाचा भागीदार होण्याची तयारी दाखवली.त्यानुसार या दोघांनी हत्येचा प्लॅन केला. रविवारी सायंकाळी या दोघींनी मिळून दोन्ही बहिणींची कोयत्याने तोंडावर आणि डोक्यावर वार करत हत्या केली. खूनाच्या तासाभरातच संशयित रोविना आणि राजाबली यांना आसगाव येथून पकडण्यात आले. त्यानंतर पोलीसी खाक्या दाखवताच दोघांनी पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.