घरदेश-विदेशसिंगर-डान्सर सपना चौधरी काँग्रेसमध्ये केला प्रवेश

सिंगर-डान्सर सपना चौधरी काँग्रेसमध्ये केला प्रवेश

Subscribe

हरियाणी सिंगर-जान्सर सपना चौधरी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. भाजप खासदार आणि जेष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी विरोधा सपना निवडणूक लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये हरियाणी सिंगर-डान्सर सपना चौधरी उतरणार आहे. निवडणुकीसाठी सपनाने काँग्रेस पक्षात काल शनिवारी प्रवेश केला आहे. सपना ही भाजप खासदार आणि जेष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सपना ही उत्तर प्रदेश येथील मथूरा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत होते. मागील काही वर्षांपासून सपना सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. यामुळे आता हेमा मालिनी यांच्या समोर सपना एक तगडे आव्हान ठरणार आहे. शनिवारी रात्री उशीरा काँग्रेसने आपल्या उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली. या यादीनुसार मथूरा मतदार संघातून महेश पाठक उमेदवार असणार आहे.

प्रियंका गांधींशी घेतली भेट

सपनाने शनिवारी उशीरा रात्री काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सपना प्रियंका गांधी वडेरा यांची भेट घेतली. मथूराच्या जागेवर काँग्रेस पक्षाची नजर आहे. मथूरा मतदान संघावर भाजप खासदार आणि जेष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांचे वर्चस्व आहे. हेम मालिनीला टक्कर देण्यासाठी सपना चौधरीला मथूरा मतदार संघ देणार असल्याचे काँग्रेसच्या सुत्रांनी सांगितले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -