घरदेश-विदेशपाक गुप्तचर यंत्रणेला 'हा' व्हॉट्सअॅपद्वारे द्यायचा माहिती

पाक गुप्तचर यंत्रणेला ‘हा’ व्हॉट्सअॅपद्वारे द्यायचा माहिती

Subscribe

भारतीय सैन्याच्या हलचालींवर नजर ठेवणाऱ्या आणि मिळालेली माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला देणाऱ्याला राजस्थान येथील जैसलमेर येथे पोलिसांनी अटक केले आहे.

भारतीय सैन्याच्या हलचालींवर नजर ठेवणाऱ्या पाकिस्तानची हेरगिरी करणाऱ्या जीप चालकाला राजस्थामधील जैसलमेर येथे पोलिसांनी अटक केली आहे. नवाब खान असे या जीप चालकाचे नाव आहे. नवाब व्हॉट्सअॅप व्हॉइस कॉल द्वारे सांकेतीक भाषांचा वापर करून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा इसइसला माहिती पुरवायचा. पोलिसांना ही माहिती समजताच नवाबवर पारख ठेवण्यात आली. त्यानंतर त्याच्या संबंधीतले पुरावे गोळाकरून अटक केली गेली.

पाकमध्ये प्रशिक्षण घेऊन भारतात परतला

राजस्थान, जैसलमेरमधील भारत-पाक सीमे जवळील सम या भागात नवाब खान जीप चालक म्हणून काम करायचा. गेल्या वर्षी नवाब हा पाकिस्तानमध्ये गेला होता. तिथे गेल्यानंतर नवाब इसइसच्या संपर्कात आला. इसइस या गुप्तचर यंत्रणेकडून नवाबला प्रशिक्षणसुद्धा दिले होते. तिथून प्रशिक्षण घेऊन नवाब भारतात परतला होता. जयपूरवरून येणाऱ्या पर्यटकांना परिसरात फिरवण्याचे काम तो करायचा. त्यामुळे पाकिस्तानमधून भारतात आल्यावर तो भारतीय सैन्याच्या हलचालींवर नजर ठेऊन होता. जैसलमेरमध्ये पाकिस्तानाला माहिती पोहचवणारा हेर आहे, असे पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांना नवाबच्या हेरगिरीसंबंधीत माहिती मिळताच त्यांच्या हालचालींवर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. त्यानंतर नवाबबद्दल खात्रीलायक पुरावे जमा करून त्याला अटक करण्यात आली. तसेच त्याच्या चौकशीतून महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे.

- Advertisement -

नातेवाईकही इसइसच्या संपर्कात

पोलिस दलातील सूत्रांनी सांगितले की, नवाब खानचा एक नातेवाईक पाकिस्तानमध्ये राहतो. तो सुद्धा इसइसचा सदस्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेत नवाब देखील इसइसच्या संपर्कात होता. भारतीय सैन्याच्या हलचाली तसेच त्यांच्या कारवायांवर नवाब नजर ठेऊन होता. सैन्यातील संपूर्ण माहिती तो पाकिस्तानला देत होता. नवाबला त्याच्या एका माहितीसाठी पाच हजार दिले जायचे. पाकिस्तानमध्ये इसइसकडून प्रशिक्षण घेऊन तो भारतात परतला होता. पोलीस दलातून माहिती मिळाली आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -