घरदेश-विदेशपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारताचा एक जवान शहीद

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारताचा एक जवान शहीद

Subscribe

पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. आज सकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे. या गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाला आहे.

भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघण केलं जात आहे. सोमवारी सकाळी साडे पाच वाजेपासून पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचं उल्लंघण केलं आहे. एलओसी विभागातून पाकिस्तानी सैन्याकडून बेछूट गोळीबार सुरु आहे. हा गोळीबार जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या सीमाभागात सुरु आहे. या गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाला आहे. तर तीन जवान जखमी झाले आहेत. पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळाबाराला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे.

सीमा भागात तणावग्रस्त परिस्थिती

१४ फेब्रुवारी रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून बदला घ्या, असा निरा गुंजत होता. या हल्ल्याच्या तेरा दिवसानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात शिरुन जैश-ए-मोहम्मदचे तळे उद्धवस्त केले. या हल्ल्यात २०० ते २५० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येत होती. दरम्यान, या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघण केलं जात आहे. त्यामुळे एलओसी आणि सीमाभागात तणावग्रस्त परिस्थिती आहे. याअगोदर भारताने पाकिस्तानतचे चार ड्रोन पाडले आहेत. परंतु, तरीही पाकिस्तानच्या कुरापती संपताना दिसत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -