घरदेश-विदेशलव्ह मॅरेजमुळे एक लाख अकरा हजारांचा दंड!

लव्ह मॅरेजमुळे एक लाख अकरा हजारांचा दंड!

Subscribe

देशात लव्ह मॅरेज ही संकल्पना दृढ झालेली असली, तरी समाजाच्या विचारसरणीत ती पूर्णपणे सामावलेली दिसत नाही. समाज आजही जातीवादसारख्या मागास विचारसरणीत अडकलेला आहे. त्यामुळेच आपल्या समाजात आंतरजातीय लग्न हे आजही एक आव्हान समजले जाते. याच आव्हानाला छत्तीसगडच्या बिलासपूर गावातील तरुण-तरुणीने तोडीस तोड उत्तर देत लव्ह मॅरेज केले. पण समाजाने या विरोधात त्या जोडप्यांच्या घरच्यांकडून एक लाख अकरा हजाराचा दंड आकारला.

आधी बहिष्कार, मग दंड
बिलासपूर गावात आंतरजातीय विवाह झाल्याने शाहू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला. त्याचबरोबर या समाजाने विवाहित कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर हा बहिष्कार रद्द व्हावा म्हणून शाहू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी या कुटुंबाविरोधात दंड आकारला. या दंडाची किंमत एक लाख अकरा हजार इतकी होती.

- Advertisement -

पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद
या घटनेविरोधी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत शाहू समाजाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली.

सज्ञान स्त्री-पुरुष इच्छेनुसार लग्न करु शकतात
सर्वोच्च न्यायालयाने या अगोदरच याविषयीवर निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी या अगोदरच सांगितले की, वयस्कर स्त्री-पुरुष आपल्या इच्छेनुसार लग्न करु शकतात . कुठलीच संस्था किंवा पंचायत यामध्ये येऊ शकत नाही.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -