बंगळूरूमध्ये एका वैज्ञानिकाचा मृत्यू

इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बैंगळूरूमध्ये झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात एका वैज्ञानिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मनोज कुमार असं या वैज्ञानिकाचं नाव आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

Bangalore
bangluru cylinder blast

इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बैंगळूरूमध्ये झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात एका वैज्ञानिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ३ वैज्ञानिक जखमी झाल्याची माहिती देखील आता समोर येत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. हायड्रोजननं भरलेल्या सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या स्फोटानंतर पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत. या स्फोटात एका वैज्ञानिकाचा मृत्यू तर ३ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मनोज कुमार असं या वैज्ञानिकाचं नाव आहे. मनोज कुमार हे मुळचे आंध्रप्रदेशातील आहेत अशी माहिती देखील यावेळी दिली गेली आहे. तर अत्युल्य, कार्तिक आणि नरेश असं जखमी झालेल्या तिघांची नावं आहेत. दरम्यान स्फोटा कसा झाला? किवा इतर कोणतीही माहिती अद्याप देखील समोर आलेली नाही. तपासाअंती सर्व माहिती समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here