घरCORONA UPDATEअमेरिकेत कोरोनाचे थैमान! २४ तासात १ हजार ९०० बळी

अमेरिकेत कोरोनाचे थैमान! २४ तासात १ हजार ९०० बळी

Subscribe

कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अमेरिकेत २४ तासात १ हजार ९०० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत ९५ हजार ७३१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १६ लाख ३ हजार ८९६ लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती Worldometer ने दिली आहे. तर महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक असून अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख ६८ हजार ८८७ इतका आहे. तर मृतांचा आकडा १६ हजार ६९७ इतका झाला आहे. यातून २५ हजार ९२८ कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत.

२४ तासात १ हजारहून अधिक मृत्यू

अमेरिकेत कोरोनाने कहर केला आहे. अमेरिकेत कोरोनांच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. २४ तासात १ हजार ९०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता अमेरिकेत भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

इटलीत १७ जणांचा मृत्यू

तर इटलीमध्ये सर्वाधिक म्हणजे १७ हजार ६६९ जणांचा मृत्यू झाला असून १ लाख ३९ हजार ४२२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर स्पेनमध्ये १ लाख ५२ हजार ४४६ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी १५ हजार २३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ब्रिटनमध्ये ६० हजार ७३३ जणांना लागण झाली असून आतापर्यंत ७ हजार ०९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चीनमध्ये हाँगकाँग आणि मकाऊ वगळता तीन हजार ३३५ जणांचा मृत्यू झाला आहे तर ८१ हजार ८६५ जणांना लागण झाली आहे, तर ७७ हजार २७९ जण उपचारांनंतर बरे झाले आहेत.


हेही वाचा – Coronavirus Live Update : सांगलीतील २६ रुग्णांपैकी २२ रुग्ण कोरोनामुक्त

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -