बापरे! १० लाखाहून अधिक सिगरेट्स जप्त, एकाला अटक

सिलीगुडीमध्ये सिगरेट्सची तस्करी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे.

West Bengal
cigarettes-istock
प्रातिनिधीक फोटो

महसूल गुप्तचर संचालनालयाने सिलीगुडी येथे एकाला १.०५ कोटी रुपयांच्या सिगरेट्सची तस्करी करताना एकाला अटक करण्यात आल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली. त्याच्याकडून तब्बल १० लाख ४३ हजार ४०० सिगरेट्स जप्त करण्यात आल्या आहेत. कोलकात्यात सिगरेट्सची तस्करी करताना त्याला अटक करण्यात आली. आज त्याला सिलीगुडी कोर्टासमोर सादर करण्यात आले. अटक करण्यात आलेली व्यक्ती बिहारचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे न्यायालय आता त्याला कोणती शिक्षा करणार याकडे लक्ष लागले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून विविध ब्रॅण्डस् ची सिगरेट्स जप्त करण्यात आली आहेत. एवढा मोठा सिगारेट्सचा साठा त्याच्याकडे कसा आला? या तस्करीत आणखी कोणी सहभागी आहे का? याबाबत पोलीस तपासाअंती स्पष्ट होईल.