घरताज्या घडामोडीदिल्लीत कलम १४४ लागू; हिंसाचारात १० जणांचा मृत्यू

दिल्लीत कलम १४४ लागू; हिंसाचारात १० जणांचा मृत्यू

Subscribe

जमावाने दोन पत्रकारांसोबत धक्काबुक्की केली. दिल्लीत शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून केजरीवाल यांची राजघाटावर प्रार्थन केली.

दिल्लीमध्ये सीएए कायद्यावरुन हिंसाचार उफाळला आहे. दिल्लीत सीएए विरोधक आणि समर्थकांमध्ये अजूनही धुमश्चक्री सुरुच आहे. आतापर्यंत दिल्ली हिंसाचारात १० जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिकजण जखमी झाले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्लीत १४४ कलम लागू करत महिन्याभरासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

दिल्लीतील मौजपूर भागात अद्याप तणावाचे वातावरण आहे. या परिसरात बऱ्याच प्रमाणात नासधूस करण्यात आली आहे. यासह पत्रकारांवरही हल्ला करत पत्रकारांनी काढलेले फोटो आणि व्हिडिओ डिलिट करायला लावल्याचा धक्कादायक प्रकारही घडला आहे. दुपारच्या सुमारास पुन्हा दगडफेक करण्यात आली. यावेळी जमावाने दोन पत्रकारांसोबत धक्काबुक्की केली. यामध्ये महिला पत्रकाराचा समावेश आहे.

- Advertisement -

जाफराबाद आणि मौजपूर भागातील हिंसाचाराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत बैठक पार पडली. गृहमंत्र्यांसोबत झालेली बैठक सकारात्मक होती आणि केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिली. या हिंसाचाराने कोणाचाही फायदा होणार नाही. सर्व पक्षांनी राजकारणापलिकडे या घटनेकडे पहायला हवे. हा दिल्लीचा प्रश्न आहे आणि सर्व पक्ष मिळून दिल्ली पुन्हा पुर्ववत करण्याचा प्रयत्न करू, असे केजरीवाल म्हणाले.

- Advertisement -

दिल्लीत शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून केजरीवाल यांनी राजघाटावर प्रार्थन केली. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत हिंसाचार सुरू आहे. यामध्ये काहींनी प्राण गमावलेत तर, अनेकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या हिंसाचाराचा फटका प्रत्येकाला बसेल. यामुळे गांधीजींच्या अंहिसेच्या मार्गावर चालण्यातच सर्वांचे हित आहे. म्हणून शांतता निर्माण होण्यासाठी आम्ही येथे प्रार्थना करतोय, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.


हेही वाचा – दिल्ली हिंसाचार : भाजपच्या या नेत्याचं हिंसाचाराशी कनेक्शन?

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -