Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश छत्तीसगड, महाराष्ट्रातून १०० नक्षली मध्य प्रदेशात

छत्तीसगड, महाराष्ट्रातून १०० नक्षली मध्य प्रदेशात

मध्य प्रदेशात बेस वाढवण्यासाठी काही महिन्यांपासून सुरू आहे घुसखोरी

Related Story

- Advertisement -

छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील सुमारे 100 नक्षलवाद्यांनी मध्य प्रदेशात घुसखोरी केली आहे. मध्य प्रदेशात बेस वाढवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून या नक्षलवाद्यांनी ही घुसखोरी केली असून या नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने अर्धसैनिक दलाच्या सहा तुकड्यांची मागणी केंद्राकडे केली आहे.

राज्यातील बालाघाट आणि आदिवासी बहुल मंडला जिल्ह्यात हे नक्षलवादी घुसले असण्याची शक्यता असून या ठिकाणी हे अर्धसैनिक दलाचे जवान तैनात करण्यात येणार असल्याचे मध्य प्रदेश पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -