घरदेश-विदेशविषारी दारुने घेतला १२३ जणांचा बळी

विषारी दारुने घेतला १२३ जणांचा बळी

Subscribe

गुवाहाटी - आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात विषारी दारु प्यायल्यामुळे तब्बल १०२ जणांचा मृत्यू झाला असून ३०० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. रुग्णालयात दाखल झालेल्यांवर उपचार सुरु आहेत.

गुवाहाटी – आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात विषारी दारु प्यायल्यामुळे तब्बल १०२ जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमध्ये गोलाघाट जिल्ह्यामधील २३ महिलांसहित ५९ पुरुषांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आतापर्यंत १२५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

दारुच्या भट्ट्या बंद

गोलाघाट जिल्ह्यात झालेल्या घटनेमध्ये अनेक जणांचा मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी चालवण्यात येणाऱ्या अवैधत्या भट्ट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गोलाघाट जिल्हामध्ये असणाऱ्या दोन दारु भट्ट्यांवर कारवाई करत दारु भट्ट्या बंद करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी दोन उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना देखील निलंबित करण्यात आले आहे. तसेच अपर आसाम मंडळाच्या ज्युली सोनोवाल यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली असून अतिरिक्त आयुक्त यांच्या नेतृत्त्वाखाली उत्पादन शुल्क विभाग याप्रकरणी चौकशी करत आहेत.

स्वस्त दारुसाठी अनेक भागात हातभट्टीची दारु काढली जाते. तसेच दारु तयार करण्यासाठी अनेक विषारी घटक देखील वापरे जातात. त्यामुळे माणसांच्या जीवांशी खेळ होतो. त्याचबरोबर अवैध दुकानांचा सुळसुळाट झाल्याने अनेक भागात अवैध धंद्ये सुरु आहेत. यापूर्वी देखील विषारी दारुमुळे अनेक जणांचा बळी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र तात्पुरती कारवाई करुन प्रत्येक वेळी यावर तोडगा न काढता पडदा टाकला जातो, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दारु पिऊन किती झिंगला आहात, सांगणार मोबाईल अॅप

हेही वाचा – अजब! किटकनाशक म्हणून शेतात गावठी दारुचा शिडकाव


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -