१०७ वर्षाच्या युट्युबस्टार ‘मस्तनाम्मा’ यांचे निधन

मस्तनाम्माचे जगभरातील लाखो चाहते पाहता त्यांच्या कुटुबिंयांनी त्यांच्या चाहत्यांना अंत्यदर्शन मिळावे यासाठी अंतयात्रा लाईव्ह ठेवली होती.

Andhrapradesh
mastanamma
युट्युबस्टार मस्तनाम्मा

युट्युबवर स्टार होण्यासाठी वयाचे बंधन नसते. हे आंध्रपदेशातील मस्तनाम्मा यांनी सिद्ध केले होते. १०७ वर्षांच्या असलेल्या मस्मनाम्मांच्या रेसिपी युट्युबवर हिट होत्या. अशा रेसिपी क्वीन मस्तनाम्मा यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या जाण्याने त्यांच्या फॅन्सवर शोककळा पसरली आहे. अल्पावधीतच मस्तनाम्मा या अनेकांसाठी आदर्श ठरल्या होत्या. त्यांचे रेसिपी करणे आणि इतरांना जेवण वाढणे अनेकांना आवडायचे. निसर्गाच्या सानिध्यात जेवण करणाऱ्या मस्तनाम्मांचे जगभरातून चाहते होते.

अशी झाली सुरुवात

सध्याच्या काळ हा युट्युबचा आहे. युट्युबवरील प्रत्येक व्हिडिओ जगभरातून पाहिले जातात. रेसिपी व्हिडिओला देखील या प्लॅटफॉर्मवरुन अधिक पाहिले जातात. मस्तनाम्मा यांचे युट्युबर कंट्री फूडस नावाचे चॅनेल आहे. १४ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांनी युट्युबवर चॅनेल सुरु केले. आज त्यांच्या युटुयुब चॅनेलचे १२ लाख सबस्क्रायबर आहेत. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. शिवाय त्यांचे वयही झाले होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी शेवटचा व्हिडिओ केला. त्यानंतर त्यांच्या घरातील अन्य महिला रेसिपी दाखवत होत्या.मस्तनाम्मा या आंध्रप्रदेशातील गुंटुर जिल्ह्यातील गुढीवाडा गावातील आहेत.

ही त्यांची युट्युवबरील शेवटची रेसिपी

(सौजन्य- country foods) 
हे माहित आहे का? – सोशल मीडियावर चर्चा ‘रॉकेट’ अंकलची

वाजत गाजत अंतयात्रा

मस्तनाम्माचे जगभरातील लाखो चाहते पाहता त्यांच्या कुटुबिंयांनी त्यांच्या चाहत्यांना अंत्यदर्शन मिळावे यासाठी अंतयात्रा लाईव्ह ठेवली होती. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ऑनलाईन श्रद्धांजली वाहिली. यावेळी अनेकांनी त्यांच्या रेसिपी अजरामर राहतील असे भावविवश होऊन म्हटले आहे. अनेकांसाठी मस्तनाम्मा या त्यांच्या आजीप्रमाणे होत्या. त्यांच्यातील कामाची चिकाटी त्याच्या व्हिडिओजमधून दिसून यायची.

रेसिपी सुरुच राहणार

मस्तनाम्मा नसल्या तरी या चॅनेलवरुन रेसिपी सुरुच राहणार आहेत. पण ज्या मस्तनाम्मांना पाहण्यासाठी व्हिडिओ पाहिला जायचा. त्या मस्तनाम्मा मात्र या पुढे त्यांच्या चाहत्यांना दिसू शकणार नाहीत.

(सौजन्य- country foods) 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here