घरताज्या घडामोडीकाय सांगताय! चक्क सुनांनी सासूला बसवले देव्हाऱ्यात!

काय सांगताय! चक्क सुनांनी सासूला बसवले देव्हाऱ्यात!

Subscribe

छत्तीसगढच्या विलासपूरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील ११ सुनांनी मिळून सासूची प्रतिमा देव्हाऱ्यात ठेवली आहे. केवळ प्रतिमाच नाही तर त्यांच्या प्रतिमेची पूजा देखील केली जाते.

सासू-सून म्हटलं की भांडण, वादविवाद हे आलेच. कारण सासू आणि सूनेचे नातं म्हणजे छत्तीसचा आकडा. पण, चक्क सासूच्या मृत्यूनंतर सासूची प्रतिमा देव्हाऱ्यात बसवल्याचे समोर आले आहे. अहो ही कथा नाही, तर सत्य घटना आहे. छत्तीसगढच्या विलासपूरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील ११ सुनांनी मिळून सासूची प्रतिमा देव्हाऱ्यात ठेवली आहे. केवळ प्रतिमाच नाही तर त्यांच्या प्रतिमेची पूजा देखील केली जाते.

- Advertisement -

प्रतिमेसमोर भजन किर्तनही केले जाते

छत्तीसगढच्या विलासपूरमध्ये राहणाऱ्या तांबोळी कुटुंबात एकूण ३९ सदस्य राहतात. यामध्ये ११ सुनांचा समावेश असून त्या अगदी आनंदानं राहतात. या सुनांची सासू गीता तांबोळी यांचे २०१० साली निधन झाले. निधन झाल्यानंतर या ११ सूनांनी मिळून सासू गीता यांची प्रतिमा तयार करुन ती देव्हाऱ्यात बसवली. इतकेच नव्हे, तर महिन्यातून एकवेळ सासूच्या प्रतिमेसमोर भजन किर्तन देखील केले जाते.

- Advertisement -

घरात तयार केले मंदिर

विलासपूर जिल्हा मुख्यालयातून किमान २५ किमी दूरवर रतनपूर येथील तांबोळी परिवारातील सुनांनी २०१० साली आपल्या सासूच्या प्रतिमेचे घरात मंदिर तयार केले. गीता देवी आपल्या सुनांवर अगदी मुलींप्रमाणे प्रेम करत होत्या. तसेच कोणताही निर्णय घेताना त्या आपल्या सुनांचे मत जाणून घ्यायच्या, असे तांबोळी कुटुंबियांनी सांगितले.

सुना सुशिक्षित आणि पदवीधर

तांबोळी कुटुंबातील सर्व सुना या सुशिक्षित असून पदवीधर आहेत. त्या सर्व जणी आपल्या पतीला कामात देखील मदत करतात. तसेच घराचा आर्थिक डोलाराही सांभाळतात. त्यांचे सासरे हे निवृत्त शिक्षक आहेत. विशेष म्हणजे तांबोळी कुटुंबियांकडे हॉटेल, किराणा दुकान, पान दुकान आणि साबण तयार करण्याचा कारखाना आहे. एवढचं नाही, तर या कुटुंबाकडे २० एकर जमीनही आहे. त्यात हे कुटुंब शेती देखील करतात.


हेही वाचा – JEE मेनच्या विद्यार्थ्यांना दिलासा, NIT-IIT प्रवेशासाठी ७५% टक्के गुणांची पात्रता रद्द


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -