हैदराबादमध्ये मुसळधार पावसाचा कहर, ११ जणांचा मृत्यू!

हैदराबादमध्ये मुसळधार पावसाचा कहर, ११ जणांचा मृत्यू!

हैदराबादमध्ये काही भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहेत. यामध्ये ९ जणांचा मृत्यू बदलागुडा येथील मोहम्मदिया हिल्समध्ये भिंत पडल्यामुळे झाला आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे रस्ताच्या नदीचे स्वरुप आले असून काही सखल भाग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. या पावसाने राज्य सरकारच्या सर्व दाव्यांचा पर्दाफाश केला आहे.

हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, ‘मुसळधार पावसामुळे बदलागुडा येथील मोहम्मदिया हिल्समध्ये भिंत पडल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळाच्या तपासणी दरम्यान मी शहाबादमध्ये अडकलेल्या बसच्या प्रवाशांना लिफ्ट दिली.’

दरम्यान एका दुसऱ्या घटनेत ४० वर्षीय महिला आणि तिची १५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. कारण मंगळवारी मुसळधार पावसामुळे इब्राहिमपटनम भागात त्यांच्यावर जुन्या घराचे छत कोसळले. दरम्यान तेलंगणाच्या अनेक भागात मंगळवारपासून मुसळधार पाऊत पडत आहे. यामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हैदराबादमधील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.

अट्टापुर मेन रोड, मुशीराबाद, टोली चौकी क्षेत्र आआणि दम्मीगुडासह अनेक भागात पाण्यात बुडाले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्याने लोक घरातचं कैद झाले आहेत. वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. सखल भागातील घरांच्या आत पाणी गेले आहेत. सध्या एसडीआरएफच्या टीमचे बचाव कार्य सुरू आहे.

तेलंगानाचे मुख्य सचिव सोमेश कुमार म्हणाले की, ‘गेल्या २४ तासांत हैदराबादमध्ये २० सेमी पाऊस झाला. एलबी नगर येथे २४ तासांत २५ सेमी पाऊस झाला. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी हैदराबादसह इतर शहरांमध्ये पावसानंतरच्या परिस्थितीचा अहवाल मागविला आहे. यासह सर्व जिल्हा प्रशासनाला जागरुक राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’


हेही वाचा – मोदी सरकारने जे हिसकावून घेतलं ते परत मिळवणार; मेहबुबा मुफ्ती यांचा इशारा