घरदेश-विदेशदहा वर्षांच्या कालावधीत जवळपास एक हजार जवानांच्या आत्महत्या

दहा वर्षांच्या कालावधीत जवळपास एक हजार जवानांच्या आत्महत्या

Subscribe

संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लोकसभेत लेखी उत्तरातून माहिती दिली.

२०१० ते २०१९ या कालावधीत भारतीय सैन्यात जवळपास १ हजार ११३ जवानांनी आत्महत्या केल्याची माहिती नुकतीच केंद्र सरकारकडून देण्यात आली. या १ हजार ११३ आत्महत्यांमध्ये ८९१ आत्महत्या भारतीय सैन्य, १८२ हवाई दलात तर ४० आत्महत्या नौदलात झाल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लेखी उत्तराद्वारे लोकसभेत सादर केली.

काय म्हणाले श्रीपाद नाईक?

यावेळी एका दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देताना श्रीपाद नाईक म्हणाले की, “आत्महत्यांप्रमाणेच २०१० ते २०१९ या कालावधीत सहकाऱ्याला ठार करण्याच्या घटनासुद्धा घडल्या. यामध्ये ३० ते २८ घटना सैन्यदलात तर २ घटना हवाई दलात घडल्याची,” माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

आत्महत्यांमागील कारणं

दरम्यान श्रीपाद नाईक यांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारे प्रश्न विचारण्यात आला. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी सरकारकडे सैन्य दलाच्या जवानांसाठी मानसिक आरोग्य धोरण आहे का? असा सवाल विचारण्यात आला. त्याबाबत माहिती देताना श्रीपाद नाईक म्हणाले की, सैन्य दलातील आत्महत्येच्या घटनांमागील कारण शोधण्यासाठी डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल रिसर्चने (डीआयपीआर) २००६ पासून अभ्यास करण्यात येत आहे. घरगुती आणि वैयक्तिक समस्या, वैवाहिक वैमनस्य, तणाव, आरोग्याच्या समस्या, आर्थिक समस्या ही अशा घटनांमागील प्रमुख कारणे असल्याची माहिती, नाईक यांनी दिली.

मानसिक आरोग्यासाठी प्रोग्राम

ते पुढे म्हणाले की, “शसस्त्र जवानांसाठी सप्टेंबर २००८ पासून सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (डीजीएएफएमएस) चे महासंचालक तर्फे मेंटल हेल्थ प्रोग्राम तयार करण्यात आला आहे. येथील सेवा कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्य आणि मानसिक समुपदेशनाबद्दल प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे या विषयावर नियमित विविध कार्यशाळा आणि व्याख्यानांचे देखील आयोजन करण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -