घरदेश-विदेशDelhi Corona: एका दिवसात १,११८ नव्या रूग्णांची नोंद; १ हजारांहून अधिकांना डिस्चार्ज

Delhi Corona: एका दिवसात १,११८ नव्या रूग्णांची नोंद; १ हजारांहून अधिकांना डिस्चार्ज

Subscribe

सध्या दिल्लीत १० हजार ५९६ अॅक्टिव्ह कोरोनाचे रूग्ण

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासांत पहिल्यांदाच ५७ हजाराहून अधिक नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासह, ७६४ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर दिल्लीमध्ये गेल्या २४ तासात १ हजार ११८ नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली असून २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह दिलासादायक बाब म्हणजे १ हजार २०० हून अधिकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

दिल्लीत आतापर्यंत १ लाख ३६ हजार ७१६ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३ हजार ९८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण आकडेवारीत १ लाख २२ हजार १३१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आहे. सध्या दिल्लीत १० हजार ५९६ अॅक्टिव्ह कोरोनाचे रूग्ण असल्याची माहिती दिल्लीच्या सरकारकडून देण्यात आली आहे.

देशात जुलै महिन्यात ११ लाख रुग्ण

भारतात जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत २.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून महिन्याच्या अखेरिस देशात कोरोनाबाधितांची संख्या ४ लाखांच्या वर होती. तर दुसरीकडे जून महिन्याच्या तुलनेत मृतांची संख्यादेखील १.६ टक्क्यांनी वाढली आहे. जून महिन्याच्या अखेरीस कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्याही ११ हजार ९८८ इतकी होती. जुलै महिन्यात कोरोनाने इतका वेग पकडला की अखेरच्या १५ दिवसांमध्ये तब्बल ७.३ लाख रुग्णांची नोंद करण्यात आली. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुप्पट असल्याचे समोर आले आहे.


दिलासादायक! देशात रिकव्हरी रेट वाढला; ११ लाख रुग्ण कोरोनामुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -