‘प्यार में धोखा’ म्हणत १२ वर्षाच्या मुलीने केली आत्महत्या

12-year-old girl commits suicide

फरीदाबाद मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने प्रेमात विश्वासघात झाल्याने आत्महत्या केली आहे. याचा खुलासा तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून झाला आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेने तिच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे.

फरीदाबादच्या बल्लभगड भागात ही मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती. त्यांच्या शेजारी राहत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या प्रेमात ही मुलगी पडली होती. मुलीने सुसाईड नोटमध्ये खुलासा केला आहे की, तिच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलावर तिचं प्रेम होतं पण त्या मुलाचं दुसर्‍या मुलीवर प्रेम होतं. यामुळे निराश होऊन आत्महत्या केली. मुलीकडे सापडलेल्या सुसाइड नोटमधून याची माहिती मिळाली, असं तिच्या वडिलांनी सांगितलं. मुलीने सुसाईड नोटमध्ये परमेश्वराला जबाबदार धरलं आहे. याबाबतचं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे