घरताज्या घडामोडीऑनलाईन गेम खेळताना १२ वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ऑनलाईन गेम खेळताना १२ वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Subscribe

कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागले आहे, त्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. नर्सरीच्या शाळेपासून ते महाविद्यालयात शिक्षण घेणारे सर्वच विद्यार्थी घरी बसले असून ऑनलाईनच्या माध्यमातून ते शिक्षण घेत आहेत. यासाठी तासनतास त्यांना हातात मोबाईल घ्यावा लागतो. मात्र आधीच गेम्स खेळण्यासाठी मोबाईल असलेल्या मुलांना मोबाईलचा आणखीच त्रास होतोय. इजिप्तमध्ये एक दुर्दैवी घटना घडली असून मोबाईल लहान मुलांसाठी किती घातक आहे, याचे उदाहरण समोर आले आहे. १२ वर्षांचा एक मुलगा सलग काही तास ऑनलाईन गेम खेळत असताना त्याचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

इजिप्त इंडपेडंट या वेबसाईने ही बातमी दिलेली आहे. १२ वर्षांच्या मुलाला पबजी गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. तो तहानभूक विसरून तासनतास पबजी खेळायचा. एकेदिवशी असेच सलग खेळत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आहे. पालक जेव्हा त्याच्या रुममध्ये आले तेव्हा तो बेशूद्ध अवस्थेत आढळून आला. पालकांनी तातडीने त्याला रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जेव्हा पालक रुममध्ये आले होते, तेव्हा त्याच्या शेजारी मोबाईलवर गेम सुरुच असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते.

- Advertisement -

kids playing online games on mobile

पोर्ट येथील अल-सलाम या रुग्णालयात त्याला नेण्यात आले होते. इमर्जन्सी विभागात तात्काळ त्याच्यावर उपचार करण्यासाठी घेण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी सांगितले की, या मुलाचा घरीच मृत्यू झाला होता. सध्या या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या मुलाच्या मृत्यूनंतर अल-अझहर सेंटरने फतवा काढून पबजी खेळ हा लहान मुलांसाठी घातक असल्याचा इशारा दिला आहे. हा खेळ सुरुवातीला चांगला वाटतो. मात्र हळुहळु तो खेळणाऱ्याला आपल्या वशमध्ये करुन घेतो.

- Advertisement -

ज्या लोकांना रोमांच, थ्रीलिंगचा अनुभव घ्यायला आवडतो, त्यांना हा खेळ आणखी आकर्षित करतो. कारण जो बेस्ट असतो तोच शेवटपर्यंत या खेळात टिकतो. अल-अझहर फतवा सेंटरने पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. आपली मुलं मोबाईलवर काय पाहतात? काय खेळतात? याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या निवदेनात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -