कॅलिफोर्नियातील बारमध्ये अंदाधुंद गोळीबार; १३ जणांचा मृत्यू

कॅलिफोर्नियातील बारमध्ये अज्ञात व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला त्यांनतर स्मोक बॉम्ब टाकून बारमध्ये पुन्हा गाळीबार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सैरावैरा पळणाऱ्या लोकांना गोळी लागली त्यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला.

America
California bar shooting
कॅलिफोर्नियामध्ये बारमध्ये गोळीबार

अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये बारमध्ये अज्ञाताने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. गर्दी असलेल्या या बारमध्ये अंदाधुंद गोळीबार केल्यामुळे १२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर पोलिसांनी गोळीबार करणाऱ्याला ठार कले आहे. कॅलिफोर्नियाजवळच्या बॉर्डरलाईन बार अॅण्ड ग्रिल या बारमध्ये स्थानिक वेळेनुसार बुधवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे.

अचानक अंदाधुंद गोळीबार

बारमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. बॉर्डरलाईन बार अॅण्ड ग्रिल या बारमध्ये गोळीबार झाल्याची माहिती रात्री ११ वाजून २० मिनिटांनी कळाली. हे बार थाउजंड ओक्स लॉस एंजिलिसपासून जवळपास ४० मैल लांब आहे. हा गोळीबार सेमीऑटोमेटिक बंदूकीतून केला गेला होता. या बारमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांची पार्टी सुरु होती.

१३ जणांचा मृत्यू

एका प्रत्यक्षदर्शिने सांगितले की, एक अज्ञात व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला त्यांनतर स्मोक बॉम्ब टाकून बारमध्ये पुन्हा गाळीबार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सैरावैरा पळणाऱ्या लोकांना गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला. तर या गोळीबारात १३ निष्पापांचा मृत्यू झाला आहे. ३० गोळ्या झाडल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here