राजस्थानमध्ये भरधाव ट्रकने ३० जणांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू

लग्नाच्या आदल्या दिवशी राजस्थानमध्ये असलेल्या प्रथेनुसार नवरी मुलीची बिंदोली निघते. सोमवारी रात्री नवरी मुलीची बिंदोली निघाली. या बिंदोलीत ट्रक घुसला

Rajasthan
rajasthan accident
राजस्थान अपघात

राजस्थानमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव ट्रक लग्नकार्यात घुसला. या ट्रकने ३० जणांना चिरडले. या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील अंबावली गावाजवळील नॅशनल हाय वे- ११३ वर सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. सोमवारी रात्री १० च्या सुमारास नॅशनल हायवेवरुन जाणाऱ्या बिंदोलीमध्ये (बिंदोली म्हणजे लग्नापूर्वीच्या रात्री नवरीमुलीची निघणारी मिरवणुक) भरधाव वेगात ट्रक घुसला. ट्रक अनियंत्रित झाल्यामुळे ही घटना घडली. या अपघातामध्ये ट्रकने १३ जणांना चिरडले. अपघामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ४ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबावली गावामध्ये राहणाऱ्या एका तरुणीचे लग्न होते. लग्नाच्या आदल्या दिवशी राजस्थानमध्ये असलेल्या प्रथेनुसार बिंदोली निघते. सोमवारी रात्री नवरी मुलीची बिंदोली निघाली. या बिंदोलीत मोठ्याप्रमाणात नातेवाईक सहभागी झाले होते. ही बिंदोली प्रतापगड-चित्तोडगड राष्ट्रीय महामार्गावरुन जात असताना अचानक भरधाव ट्रक गर्दीमध्ये घुसला. या ट्रकने बिंदोलीमध्ये सहभागी झालेल्या अनेकांना चिरडले. ट्रक बिंदोलीत घुसल्यामुळे सगळ्यांनी पळापळ करण्यास सुरुवात केली. या अपघातामध्ये १३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले. जखमी झालेल्यांमध्ये नवरीमुलीचा देखील समावेश आहे. जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे राजस्तानमधील गाडोलिया समाजावर शोककळा पसरली आहे. टॅकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे वर्तवले जात आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले

अपघातानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करुन या घटनेवर दु:ख व्यक्त केले. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ‘प्रतापगडमध्ये नॅशनल हायवे – ११३ वर झालेल्या भीषण अपघातामध्ये अनेकांचे मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. ही घटना कळाल्यावर दु:ख झाले. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. प्रार्थना करतो की अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत.’

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here