घरदेश-विदेशएका IMEI क्रमांकावर चालत होते १३ हजारांहून अधिक मोबाईल!

एका IMEI क्रमांकावर चालत होते १३ हजारांहून अधिक मोबाईल!

Subscribe

मेरठमध्ये एका आयएमईआय क्रमांकावर १३ हजारांहून अधिक मोबाइल फोन चालू होते.

प्रत्येक मोबाइल फोनमध्ये एक आयएमईआय नंबर असतो. या आयएमईआय नंबरमुळे तो फोन ओळखला जातो. या आयएमईआय नंबरवर सहसा एक किंवा दोन सिम कार्ड वापरले जाऊ शकतात. मात्र उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये असा एक प्रकार घडला की, तो ऐकून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल.

मेरठमध्ये एका आयएमईआय क्रमांकावर १३ हजारांहून अधिक मोबाइल फोन चालू होते. हा प्रकार समोर येताच पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. खरं तर एका आयएमईआय नंबरवर इतके फोन चालू राहणं हे अशक्य असल्याने सर्वत्र या घटनेचीच चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

असा घडला प्रकार

एका पोलिस कर्मचाऱ्याने आपला मोबाइल फोन तपासासाठी सायबर क्राइम सेलमधील कर्मचार्‍यांना दिल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. कारण दुरुस्तीनंतरही त्याचा फोन व्यवस्थित काम करत नव्हता.

मेरठचे एसपी अखिलेश एन. सिंग यांनी असे सांगितले की, ज्यावेळी फोन तपासणीसाठी सायबर क्राइम सेलला देण्यात आला त्यावेळी असे लक्षात आले की, त्याच आयएमईआय क्रमांकावर साधारण १३ हजारांहून अधिक मोबाईल कार्यरत आहेत.

- Advertisement -

सिंग म्हणाले, हे प्रकरण गंभीर सुरक्षेसंबंधित आहे. सुरुवातीला मोबाईल फोन कंपनीकडून दुर्लक्ष झाल्यासारखे दिसते आणि गुन्हेगार त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. तसेच कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तज्ज्ञांच्या पथकाला या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी बोलविण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.


Airtel कंपनी ‘या’ ग्राहकांना देतेय 1000GB डेटा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -