संतापजनक! पार्टीहून परताना तरुणीवर बलात्कार; गुप्तांगावर केले वार

पार्टीहून परताना एका १६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगावर वार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे.

संतापजनक! पार्टीहून परताना तरुणीवर बलात्कार; गुप्तांगावर केले वार

उत्तर प्रदेशातील हाथरसची घटना ताजी असताना पुन्हा एक संतापजनक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील रेवा येथे एक १६ वर्षीय तरुणी पार्टीहून परताना तिच्यावर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. संतापजनक बाब म्हणजे तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिच्या गुप्तांगावर वार करण्यात आले. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी मुख्य आरोपी अंकित रावत याला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी सध्या फरार आहे.

नेमके काय घडले?

मध्य प्रदेशातील रेवा येथे एक १६ वर्षीय पीडित मुलगी गुरुवारी एका पार्टीहून घरी परतत होती. त्याचवेळी दोघांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर मुख्य आरोपी अंकितने तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिच्या गुप्तांगावर वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश सिंह यांनी दिली आहे.


हेही वाचा – मृत अर्भकावरून प्रकरण उघडकीस; जन्मदात्याकडून अल्पवयीन राहिली होती गर्भवती