घरदेश-विदेशकेरळ, कर्नाटकात पावसाचे थैमान; १६६ जणांचा मृत्यू

केरळ, कर्नाटकात पावसाचे थैमान; १६६ जणांचा मृत्यू

Subscribe

केरळ आणि कर्नाटकात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. महापुरामुळे आतापर्यंत १६६ जणांचा मृत्यू झाला आहे.

कर्नाटक आणि केरळमध्ये पावसाने थैमान घातले आहे. कर्नाटकातील २२ जिल्ह्यांमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे केरळ आणि कर्नाटकमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कर्नाटकात महापुरामुळे आतापर्यंत ६२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर केरळमध्ये १०४ जणांचा महापूरामुळे मृत्यू झाला आहे. अजूनही ३६ जण बेपत्ता आहेत. एनडीआरएफचे जवान, नौदल, सैन्य दल आणि वायूदलाचे सैन्य युद्ध पातळीवर तेथील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता जवान तिथे काम करत आहेत. मात्र, पाऊस थांबत नसल्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत.

केरळमधील परिस्थिती अत्यंत भीषण

पावसामुळे केरळची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १०४ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय २ लाख ८७ हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. केरळमध्ये आतापर्यंत १६५४ शिबिर तयार करण्यात आले आहे. वायनाड आणि मलप्पुरम जिल्ह्यात महापुरामुळे फार वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

कर्नाटकात १४ हजार घरांचे नुकसान

कर्नाटकातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कर्नाटकातील परिस्थिती सुधारावी म्हणून कर्नाटक सरकारने ३००० कोटी रुपयांच्या सहायता निधीची मागणी केली आहे. त्याचबरोबर कर्नाटकात १४ हजार घरांचे नुकसान झाले आहे. कर्नाटकात प्रभावित क्षेत्रांमध्ये ६२४ शिबिरे तयार करण्यात आले आहेत. या शिबिरांमध्ये आतापर्यंत १ लाख ५७ हजार ४९८ नागरिकांना आश्रय देण्यात आला आहे. या सर्व नागरिकांना शिबिरांमध्ये पाणी, जेवन, औषधे, कपडे, चादरी इत्यादी सुविधा दिल्या जात आहेत.


हेही वाचा – नद्यांचे ऑडिट आणि पूररेषेवर नियंत्रणच रोखेल महापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -