आत्महत्येचं गुढ! कुंडलीत योग; दोन सख्ख्या भावांनी एकामागोमाग दिला जीव

मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्येही दिल्लीतील बुराडीसारखी घटना समोर आली आहे. इथे एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांनी लागोपाठ मृत्यूला जवळ केले. मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर लहान भावानेही त्याच जागी जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही भावाच्या मृत्यूमध्ये कुंडली कनेक्शन समोर आले आहे.

नदीत उडी मारून संपवले आयुष्य 

सोमवारी आत्महत्या करणारे पीयुष चौहान यांचे मोठे भाऊ प्रवीण चौहान यांनी आत्महत्येपूर्वी स्वतःची कुंडली बनवली होती. ज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत आत्महत्येचा योग दाखवला गेला होता. कुंडलीत ग्रहांमध्ये वाईट दोष दाखवल्याच्या उल्लेख करत पीयुष यांचे भाऊ प्रवीण यांनी नमूद केले होते की, कितीही प्रयत्न करा, आत्महत्येचा योग आहेच. आता काय उरलयं. काहीच नाही. अध्याय समाप्त. त्यांनी कुंडतील शेवटी नमूद केले की, जय महाकाल.
त्यानंतर प्रवीण चौहान यांनी शिप्रा नदीवरील पूलावर जाऊन खाली उडी मारली आणि जीव दिला. मरण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून स्वतः झालेले कर्ज आणि आजारपणाचाही उल्लेख केला होता. तसेच आपल्या कुटुंबियांना त्यांचे श्राद्धकार्य न करण्यास सांगितले होते. हे कर्ज एका जमिनीच्या व्यवहारासंबंधीत असल्याचे सांगितले.

मोठ्या भावाच्या आत्महत्येनंतर तीन दिवसांनी लहान भाऊ प्रवीण चौहान यानेदेखील पीयुषसारखेच नृसिंह घाट पूलावरून उडील मारून आत्महत्या केली. दोन्ही सख्ख्या भावांच्या अशा गूढ पद्धतीने झालेल्या मृत्यूमुळे मध्य प्रदेशात एकच खळबळ माजली आहे. पोलीस सध्या या आत्महत्येचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा –

बॅडन्यूज! यामुळे जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनने थांबवल्या कोरोना लसीच्या चाचण्या!