घरदेश-विदेशअमेरिकेच्या प्राणी संग्रहालयात २ गोरिला कोरोना पॉझिटिव्ह

अमेरिकेच्या प्राणी संग्रहालयात २ गोरिला कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

काही दिवसांपूर्वी त्या प्राणी संग्रहालयातील काही लोकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तिथले प्राणी लोकांच्या संपर्कात आल्याने त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यात आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे अनेक राज्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राण्यांमध्ये कोरोनाचा धोका धोका नाही असे तज्ज्ञांनी सांगितले होते. कोरोनाच्या सुरूवातीला वुहानमध्ये एका कुत्र्यांला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते मात्र त्या कुत्र्यांच्या मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले गेले. मात्र आता अमेरिकेत दोन गोरिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. गोरिलाला कोरोनाची लागण झाल्याचे आता समोर आले आहे.

- Advertisement -

न्यूयॉर्कच्या कॅलिफोर्नियातील सॅन डिएगो झू सफारी पार्कमध्ये दोन गोरिलांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी त्या प्राणी संग्रहालयातील काही लोकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तिथले प्राणी लोकांच्या संपर्कात आल्याने त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. इथल्या गोरिलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याचे सफरी पार्कच्ये कार्यकारी संचालक लिसा पीटरसन यांनी सांगितले आहे. तिथे असलेल्या गोरिलांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे समोर आले आहे. त्यांचा त्रास लक्षात येताच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणी केल्यानंतर दोन्ही गोरिलांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात म्हणजेच जुलै महिन्यात शांगो नावाच्या एका गोरिला कोरोची लागण झाल्याचे समोक आले होते. शांगोमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती. तब्बल सात जणांच्या टिमने शांगोला पकडले होते. आता पुन्हा एकदा दोन गोरिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तिथल्या लोकांमध्ये आणि सफारी पार्कच्या इतर प्राण्यांची अधिक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – सायना नेहवाल कोरोना पॉझिटिव्ह; थायलंड ओपन स्पर्धेआधीच भारताला धक्का

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -