जम्मू – काश्मीरमध्ये २ दहशतवादी ठार

जम्मू - काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पुलवामा जिल्ह्यातील टेकीन गावात जवानांनी या दहशतवाद्यांना ठार केलं आहे.

Srinagar
2 terrorists killed in encounter in Jammu and Kashmir
जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार ( फेाईल फोटो )

जम्मू – काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पुलवामा जिल्ह्यातील टेकीन गावात जवानांनी या दहशतवाद्यांना ठार केलं आहे. गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यावेळी लष्करानं सर्च ऑपरेशन सुरू केलं. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. परिणामी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं आहे. दरम्यान, खात्मा केलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न लष्कराकडून सुरू आहे. दिवसेंदिवस जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढताना दिसत आहे. दोन दिवसापूर्वी देखील जवानांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. सीमेपलिकडून होणाऱ्या कारवायांना लष्काराकडून देखील चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. वाढत्या दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर द्या असे आदेश देखील सरकारनं लष्कराला दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here