शोपियांमध्ये चकमक; हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी ठार

सर्च ऑपरेशन दरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवांनी देखील त्यांना चोख प्रत्यूत्तर दिले. दरम्यान या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे.

Jammu-Kashmir
2 terrorists killed in Shopian
शोपियांमध्ये दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यामध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. यामधील एक दहशतवादी आधी भारतीय सैन्यात होता त्यानंतर काही दिवसांपूर्वी तो दहशवादी संघटनेमध्ये सहभागी झाला होता.

दोन दहशतवादी ठार

दक्षिण काश्मीरमधील जैनापोराच्या सफानगरी भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी मंगळवारी परिसराला घेराव घालून सर्च ऑपरेशन सुरु केले. सर्च ऑपरेशन दरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवांनी देखील त्यांना चोख प्रत्यूत्तर दिले. दरम्यान या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे.

दोघे दहशतवादी शोफियांचे

चकमकीत ठार केलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटलेली असून मोहम्मद इदरिस सुल्तान उर्फ छोटा अबरार आणि आमिर हुसैन राथर उर्फ अबु सोबान अशी नावे सांगितली आहे. मोहम्मद इदरिस सुल्तान शोफियाच्या सफानगरीमध्ये राहणारा होता तर अबु सोबान शोपियांमध्ये राहणार होता. दोघे ही हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी होते. जवानांवर हल्ला त्याचसोबत परिसरातील नागरिकांवरील अत्याचारांच्या घटनेमध्ये दोघांचा हात होता.

जवान बनला दहशतवादी

मोहम्मद इदरिस सुल्तान लष्करात जवान होता. काही महिन्यापूर्वी तो फरार झाला होता. यावर्षी एप्रिल महिन्यात हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेमध्ये तो सहभाही झाला होता. आज झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असून जवानांनी घटनास्थळावरुन मोठा शस्त्रसाठी जप्त केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here