घरदेश-विदेशJammu & Kashmir: दहशतवाद्यांचा सुरक्षा दलावर गोळीबार; जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरचा खात्मा

Jammu & Kashmir: दहशतवाद्यांचा सुरक्षा दलावर गोळीबार; जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरचा खात्मा

Subscribe

जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशीरा सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशीरा सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती मिळतेय. जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चादौरा भागातील मोचवाह येथे दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने घेराव घातला आणि शोध मोहीम सुरूच ठेवली. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला त्यानंतर दोन्ही बाजूने चकमकीला सुरुवात झाली.

- Advertisement -

दरम्यान, अजूनही दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक सुरू आहे. दहशतवादी पळून जाऊ नयेत यासाठी सुरक्षा दलांनी जवळच्या गावातील प्रवेश आणि निर्गम ठिकाणं सील केल्याचे सांगण्यात आले आहे.

दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. या कारवाईत २ दहशतवादी ठार झाल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली. झालेल्या क्रॉस फायरिंग दरम्यान दहशतवादी ज्या घरात लपले होते त्या घराला आग लागली. यात २ दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख जैश-ए-मोहम्मदचा कमांडर म्हणून झाली आहे.


कंटेन्मेंट झोनमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -