घरदेश-विदेश#Bharat Bandh: बिहारमध्ये २ वर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर राजकारण तापले

#Bharat Bandh: बिहारमध्ये २ वर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर राजकारण तापले

Subscribe

बिहारमध्ये भारत बंदला हिंसकवळण आले आहे. हॉस्पिटलमध्ये जाताना रुग्णवाहिकेतच एका दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. पिडीत कुटुंबियांनी भारत बंदमुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दर वाढीविरोधात आज देशभरामद्ये विरोधी पाक्षाच्यावतीने पुकारलेल्या बंदला देशभरातील अनेक भागामध्ये हिंसकवळण आले आहे. बिहारमध्ये बंद दरम्यान रास्तारोको आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान जहानाबादमध्ये या बंद दरम्यान एक अनुचित घटना घडली आहे. हॉस्पिटलमध्ये जाताना रुग्णवाहिकेतच एका दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. पिडीत कुटुंबियांनी भारत बंदमुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, या घटनेवरुन आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या घटनेवरुन विरोधीपक्षावर जोरदार टीका केली आहे.

बंदमुळे २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

बिहारच्या जहानाबादमध्ये या बंद दरम्यान २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भारत बंद दरम्यान करण्यात आलेल्या रास्तारोकोमुळे अॅम्ब्युलन्स बराच वेळ ट्राफिकमध्ये अडकून राहिली. त्यामुळे मुलीला वेळेत हॉस्पिटलला घेऊन जाता आले नाही आणि मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, जहानाबादचे एसडीओ परितोष कुमार यांनी सांगितले आहे की, मुलीचा मृत्यू भारत बंद किंवा रास्तारोकोमुळे झाला नाही. परंतू मुलीच्या कुटुंबियांनी तिला घरातून खूप उशिरा हॉस्पिटलमध्ये आणले असल्याचे सांगितले.

- Advertisement -

मुलीच्या मृत्यूला जबाबदार कोण?

विरोधकांच्या भारत बंदला देशातील जनतेने समर्थन केले नाही. त्यामुळे हिंसेचा मार्ग स्विकारला जात आहे तसंच भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. प्रत्येकाला विरोध करण्याचा अधिकार आहे. मात्र अशाप्रकारे हिंसाचार करणे कितपत योग्य आहे? पेट्रोल पंप आणि बसची तोडफोड करत आग लावण्यात आली. जहानाबादमध्ये ट्राफिकमध्ये अॅम्ब्युलन्स अडकल्याने एका लहान मुलीचा मृत्यू झाला. याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -