अल्पवयीन मुलीवर ‘२०’ जणांनी केला बलात्कार, बापाचाही समावेश

मुलीने दिलेल्या माहितीनुसार तिच्यावर पहिल्यांदा चार पुरुषांनी १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी एका लॉजमध्ये नेऊन बलात्कार केला. यात युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या स्थानिक राजकीय पक्षातील नेत्यांचा देखील यात समावेश आहे.

Kannur,kerala
rape
फोटो प्रातिनिधीक आहे.

मुलगी शाळेत जात नाही, घराबाहेर जायला घाबरते. त्यामुळे काळजीत पडलेल्या आईने आणि तिच्या मामाने मुलीची चौकशी केली असता धक्कादायक प्रकार या मुलीने आईला सांगितला आहे. १६ वर्षाच्या मुलीवर गेल्या महिन्यापासून बलात्कार होत असून तिच्यावर २० जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचे सांगितले. शिवाय या २० जणांमध्ये तिच्या वडिलांचाही समावेश असल्याचे तिने सांगितले आहे. हे ऐकून धक्का बसलेल्या आईने तिला तातडीने पोलीस स्टेशनमध्ये नेत सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना केरळामधील कन्नुर येथे घडली असून या घटनेमुळे या परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

वाचा- अश्लील फोटोचा धाक दाखवत तरुणीवर बलात्कार

नेमकं प्रकरण काय?

मुलीने दिलेल्या माहितीनुसार तिच्यावर पहिल्यांदा चार पुरुषांनी १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी एका लॉजमध्ये नेऊन बलात्कार केला. यात युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या स्थानिक राजकीय पक्षातील नेत्यांचा देखील यात समावेश आहे. या आधी देखील या मुलीवर नातेवाईकांकडून अत्याचार करण्यात आले आहे.त्यानंतर तिच्यावर अन्य काही जणांनी बलात्कार केला. त्यात तिचे वडील असल्याचे देखील तिने सांगितले आहे.

वाचा- झोपेतच मुलीचे केले अपहरण; कारमध्ये केला सामुहिक बलात्कार

फेसबुकवर एकीशी केली होती मैत्री

मुलीने महिला पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिने एका महिलेशी फेसबुकवर मैत्री केली होती. तिने तिची ओळख आपल्या भावालादेखील करुन दिली होती. ती तिला भेटण्यासाठी पारसिन्नीकवडू ती गेली असता. त्याचवेळी तिला चार पुरुषांनी पळवले आणि तिच्यावर लॉजमध्ये जाऊन बलात्कार केला.

वाचा-हत्या करुन महिलेच्या मृतदेहावर केला बलात्कार

२० जणांची सांगितली नावे

या मुलीने तिच्यावर बलात्कार केलेल्या २० जणांची नावे देखील सांगितली आहेत. ज्यात तिच्या वडिलांचे नाव देखील तिने घेतले आहे. या प्रकरणात निखिल थालियिल, मट्टूल केवी संदिप, अरिंब्रा के पवित्रान, पाराप्पायी वीसी शाबीर, कुरुमाथूर चोरोकल्ला, सीपी समशुद्दीन अशी काही नावे मुलीने घेतली असून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे माहित आहे का? – सापाचा धाक दाखवून बलात्कार करणाऱ्याला तोच साप डसला

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here