भाजप विरोधात कोलकातामध्ये ‘महा’शक्तीप्रदर्शन; नेत्यांची एकजूट

ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या संयुक्त भारतीय विरोधक सभेमध्ये देशभरातील प्रमुख विरोधी पक्ष सहभागी झाल्याचे चित्र दिसत आहे.

Mumbai
20 national leaders join maha rally with mamta banerjee in kolkata to fight against bjp
ममता बॅनर्जींच्या महासभेला सुरुवात

पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात आज भाजप विरोधात ‘महा’शक्तीप्रदर्शन केले जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या तृणमूल काँग्रेस या पक्षाद्वारे आज एका महासभेचे आयोजन केले आहे. या सभेसाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं असून या महासभेत शरद पवार, चंद्राबाबू नायडू, देवेगौडा, एम.के. स्टॅलीन, अखिलेश यादव यांच्यासह अनेक बड्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली आहे. या सभेतून ममता बॅनर्जी आपली राजकीय ताकद आजमविण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे. ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या संयुक्त भारतीय विरोधक सभेमध्ये देशभरातील प्रमुख विरोधी पक्ष सहभागी झाल्याचे चित्र दिसत आहे. भाजप विरोधात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी एका ‘महारॅली’चे देखील आयोजन करण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, ममता बॅनर्जी काही वेळापूर्वीच सभास्थानी पोहचल्या आहेत.

आगमी निवडणूकांमध्ये नरेंद्र मोदींना पर्याय कोण? हा प्रश्न सध्या अधिकच चर्चेचा विषय ठरतो आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील अनेक नेते ते स्वत: नेतृत्वाच्या शर्यतीत असल्याचे संकेतही देत आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, बसपच्या मायावती, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू या बड्या नेत्यांची नावे केंद्रस्थानी आहेत. याच धर्तीवर ममता बॅनर्जींनी आज या महा शक्तीप्रदर्शनाचे आयोजन केल्याचे समजते आहे. या सभेत काँग्रेससह इतर भाजपविरोधी पक्षांचे मोठेमोठे नेते सहभागी होत असले, तरी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यामध्ये सहभाग घेणार नसल्याचं वृत्त समोर आलं आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here