घरताज्या घडामोडी२००९ दहशतवादी हल्ला : बस ड्रायव्हरने जीव वाचवला - कुमार संगकारा

२००९ दहशतवादी हल्ला : बस ड्रायव्हरने जीव वाचवला – कुमार संगकारा

Subscribe

२००९ मध्ये, श्रीलंकेचा संघ लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्तानविरूद्ध एक कसोटी सामना खेळणार होता, तेव्हा बसलेल्या दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केला.

श्रीलंकेचा क्रिकेटर कुमार संगकाराने पुन्हा एकदा लाहोरमध्ये श्रीलंकेच्या टीम बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेची पुन्हा एकदा आठवण काढली आहे. २००९ मध्ये, श्रीलंकेचा संघ लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्तानविरूद्ध एक कसोटी सामना खेळणार होता, तेव्हा बसलेल्या दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केला. त्यावेळी संगकारा संघाचा कर्णधार होता.

या घटनेची आठवण करून देत संगकारा म्हणाले की, त्यांच्या टीमचा बस चालक प्रत्यक्षात एक हिरो होता. त्याने हल्ला झालेल्या ठिकाणाहून बसला सुखरूप बाहेर काढले. वास्तविक, मेहर मोहम्मद खलील नावाचा चालक बस चालवत होता.  त्याच्या शहाणपणाने संपूर्ण टीमला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. जोरदार गोळीबारातून ड्राइव्हरने बस चालवत स्टेडियममध्ये पोहोचले.

- Advertisement -

संगकाराने स्काय स्पोर्ट्सला सांगितले की, ‘आम्ही त्यावेळी पाकिस्तान मध्ये गेलो , तेव्हा सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा होता. आम्ही सुरक्षिततेविषयी आमच्या चिंतेबद्दल लिहिले होते आणि असेही म्हटले आहे की, जर कोणतीही विपरीत घटना घडली, खेळाडूंचा विमा उतरविला जावा. पाकिस्तानमध्ये जाण्यास आम्ही नम्रपणे नकार दिला. परंतु आम्हाला सांगण्यात आले की, सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रकारची काळजी घेतली आहे. म्हणून आम्ही तिथे गेलो.

ते म्हणाले, ‘त्यावेळी आमच्या टीमला मसाज देणारी व्यक्तीसुद्धा समोर बसली होती. जेव्हा आम्हाला बंदुकीचा आवाज ऐकू आला तेव्हा त्याने विचार केला की फटाक्यांचा आवाज आहे, नंतर तो उठला आणि म्हणू लागला की सगळ्यांनी खाली बसा, दहशतवादी बसवर गोळीबार करीत आहेत. दिलशानसुद्धा समोर होता. मी बसच्या मधल्या सीटवर बसलो होतो. महेला जयवर्धने आणि मुरलीधरन अगदी आमच्या मागे होते. मला आठवते की सलामीवीर फलंदाज थरंगा समोर होता.

- Advertisement -

माजी कर्णधार म्हणाला, ‘त्याने अनेकदा बसवर गोळीबार केला, ग्रेनेड फेकले आणि रॉकेट लाँचरचा वापरही केला. त्या दिवशी आम्ही कसे वाचलो हे मला माहित नाही.  या हल्ल्यात थिलन (समरवीरा) यांना दुखापत झाली, तर मला खांद्याजवळ दुखापत झाली.

संगकारा म्हणाले, हल्लेखोरांनी ड्रायव्हरला ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रत्येक वेळी बचावला. तो नायक होता ज्याने आम्हाला तेथून वाचवले. त्याने बस थेट स्टेडियमवर नेली आणि मग आम्हाला बसमधून खाली उतरविले. हल्ल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंना स्टेडियममधून हेलिकॉप्टरने विमानतळावर हलविण्यात आले.  विशेष म्हणजे श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही खलीलचा गौरव केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -