…यामुळे निर्भयाच्या दोषींना २२ जानेवारीला फाशी नाही

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चारही दोषींना निर्धारित दिवशी आणि ठरलेल्या वेळी फाशी देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला होता. मात्र, निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना २२ जानेवारी रोजी फाशी होणार नाही.

Nirbhaya case
फाशी नको, आजीवन कारावास द्या; निर्भयाच्या दोषीची मागणी

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चारही दोषींना निर्धारित दिवशी आणि ठरलेल्या वेळी फाशी देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला होता. मात्र, निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना २२ जानेवारी रोजी फाशी होणार नाही. कारण या प्रकरणातील चार आरोपींपैकी एक असलेल्या मुकेश याने कनिष्ठ न्यायालयाकडून सुनावण्यात आलेल्या डेथ वॉरंटला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ज्यावर आज, न्यायालयात सुनावणी सुरु आहे. तर आरोपीच्या वकिलाने न्यायालयात युक्तीवाद केला आहे की, राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर देखील त्याला १४ दिवसांचा वेळ मिळतो, यामुळे डेथ वॉरंट रद्द करावे. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयातील सुनावणीवेळी दिल्ली सरकारकडून सांगण्यात आले की, येत्या २२ जानेवारी रोजी फाशी देता येणार नाही. मात्र, तुरुंग प्रशासनाच्या नियमांनुसार डेथ वॉरंटसाठी आरोपीच्या दयेच्या अर्जावर निर्णय येण्याची वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान, दिल्ली सरकारकडून असे देखील सांगण्यात आले आहे की, जर दयेचा अर्ज प्रलंबित असेल तर तुरुंग प्रशासनाच्या नियामानुसार फाशी देता येत नाही. तसेच सरकार यासंदर्भात २१ जानेवारी रोजी कनिष्ठ न्यायालयात बाजू मांडणार आहे. जर दयेचा अर्ज फेटाळला जात असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार १४ दिवसांचा कालावधी नव्या डेथ वॉरंसाठी द्यावा लागेल.

या अगोदर मंगळावरी, निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. विनय शर्मा आणि मुकेश या दोघांनी ही याचिका दाखल केली होती. न्या. आर भानुमती आणि अशोक भूषण यांच्या ५ न्यायाधीशांच्या पिठाने ही याचिका फेटाळली आहे.


हेही वाचा – शरद पवारच ‘जाणता राजा’; घाटकोपरमध्ये झळकले पोस्टर्स