CoronaVirus: पाकचे २३० सैनिक करोनाच्या संशयामुळे आयसोलेशनमध्ये…

पाकिस्तानलाही करोनाचा फटका

Mumbai
230 cops deployed in mardan village to enforce lockdown
पाकचे २३० सैनिक कोरोनाच्या संशयामुळे आयसोलेशनमध्ये

जगभरात करोनाची दहशत वाढत असताना चीनच्या वुहानमध्ये सुरूवात झालेल्या करोनाने आपले हात पाय सर्वत्र पसरायला कधीच सुरूवात केली आहे. सध्यस्थितीत जगभरात २० हजाराहून अधिक लोकं मृत्यू पावले, असे असताना या करोनाच्या विळख्यात पाकिस्तान देखील अडकून पडले आहे. पाकिस्तानमध्ये करोना व्हायरसचे संक्रमण होत असून पाकच्या लष्करात देखील करोनाने एण्ट्री केल्याचे उघड झाले आहे. यामध्ये २३० सैनिकांना करोना व्हायरसच्या संशयामुळे आयसोलेशनमध्ये दाखल करण्यात आले आहे. या २३० सैनिकांपैकी ४० जणांची चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले आहे. या पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये पाकच्या लष्करांच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

अशी आहे पाक सैनिकांना क्वारंटाईन केलेली संख्या

गिलगित-बाल्टिस्तानमध्ये २८, डोमेलमध्ये ४१, बागमध्ये ९, रावलाकोटमध्ये १४, मीरपुरमध्ये ४५ आणि खैबर पख्तुनख्वामध्ये ५५ पाकिस्तानी सैनिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तिथेच मुजफ्फराबादमध्ये २१, रावलाकोटमध्ये ९, कोटलीमध्ये २, बलोचिस्तानमध्ये ८ आणि खैबर पख्तुनख्वा- पंजाबमध्ये एक-एक सैनिकांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – Coronavirus Live Update: राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा १२५ वरून १३०वर!

पाकिस्तानच्या मुख्य शहरात म्हणजे पंजाबमध्ये व्हायरस पसरण्याचा धोका असून पाकिस्तानचे क्वारंटाइन सेंटर पीओके आणि गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये स्थापित करण्यात आले आहे.

आतापर्यंत देशातील करोनाग्रस्तांची संख्या

 • आंध्रप्रदेश ११
 • छत्तीसगढ ६
 • दिल्ली ३६
 • महाराष्ट्र १२५
 • पश्चिम बंगाल १०
 • बिहार ७
 • गुजरात ४३
 • हरयाणा ३२
 • पंजाब ३३
 • लडाख १३
 • उत्तर प्रदेश ४२
 • हिमाचल ३
 • कर्नाटक ५५
 • केरळ १३७
 • मध्य प्रदेश २०
 • तमिळनाडू २९
 • उत्तराखंड ५
 • ओडिसा ३
 • पॉंडेचरी १
 • जम्मू काश्मीर १४
 • राजस्थान ४०
 • चंदीगढ ७
 • तेलंगणा ४४
 • मनिपूर १
 • अंदमान-निकोबार – १
 • मिझोरमा – १
 • गोवा – ३
 • एकूण – ७२२

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here