घरदेश-विदेश२५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत

२५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत

Subscribe

काश्मीर खोर्‍यात ३०० दहशतवादी सक्रिय असून सुमारे २५० दहशतवादी पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. जम्मू-कश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्यावेळी हिंसाचार घडवण्याचा पाकिस्तानचा कट आहे.

दहशतवाद्यांना खोर्‍यात घुसखोरी करण्यापासून रोखण्यासाठी लष्कराने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. सोमवारपासून चार टप्प्यांत स्थानिक निवडणुका होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया विस्कळीत करण्यासाठी पाकिस्तानकडून आगळीक केली जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हे दहशतवादी निवडणुकीवेळी मोठा घातपात करण्याच्या इराद्याने काश्मीरमध्ये घुसणार आहेत. सैन्यदलाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, भारतीय जवानांना इशारा देण्यात आला असून लष्करासह पोलीस आणि सीमा सुरक्षा दलांनी सतर्कता वाढविली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांना तपासणी नाक्यांवर कडक बंदोबस्त ठेवण्यास सांगण्यात आला आहे. वाहनांची तपासणी सोबतच संशयित व्यक्तींवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांवरही हल्ले होण्याची शक्यता असल्याने त्यांनाही सुरक्षा देण्यात आली आहे. याशिवाय श्वानपथकेही ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -