Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुंबईच्या २६/११चा मास्टरमाईंड झाकीर रहिमन लखवीला बेड्या

मुंबईच्या २६/११चा मास्टरमाईंड झाकीर रहिमन लखवीला बेड्या

Related Story

- Advertisement -

मुंबईसाठी २६ नोव्हेंबर २००८ हा काळा दिवस होता. देशातील सर्वात मोठा हल्ला मुंबईत या दिवशी झाला. या हल्ल्यात एकूण १६६ निष्पाप लोकांनी जीव गमावला. दरम्यान या मुंबईतील २६/११चा मास्टरमाईंडला अखेर बेड्या पडलेल्या आहेत. मास्टरमाईंड झाकीर रहमान लखवीला पाकिस्तानमध्ये बेड्या घातल्या असून त्यांच्यावर दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

- Advertisement -

पाकिस्ताचे पंजाब दहशतवादी विरोधी विभागाचे प्रवक्त्यांनी दुजोरा दिला आहे आणि सांगितले की, ‘लखवीला लाहोरमधून अटक केली आहे. डिस्पेंसरीच्या नावाखाली मिळालेला निधीचा वापर तो दहशतवाद्यांसाठी करत होता, असा आरोप लखवीवर केला आहे.’ २००८मधील मुंबई हल्लानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने लखवीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादी म्हणून घोषित केले होते.

पाकिस्तानाकडून फायनॅन्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या (FATF) काळ्या यादीत सामील होऊ नये यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जातात. दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत असल्याचे पाकिस्तानाकडून देखावे दाखवले जातात. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तानच्या एफआयएने मॉस्ट वॉन्टेंड दहशतवाद्यांच्या यादीत मुंबईमधील हल्ल्यातील ११ जणांचा सामील केले होते.


- Advertisement -

हेही वाचा – Live Update: प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया याचा पोलीस कोठडीतला मुक्काम वाढला


 

- Advertisement -