घरदेश-विदेशगज चक्रीवादळाचे तामिळनाडूमध्ये ३ बळी, ८१००० स्थलांतर

गज चक्रीवादळाचे तामिळनाडूमध्ये ३ बळी, ८१००० स्थलांतर

Subscribe

गज चक्रीवादळामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ८१ हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

गज चक्रीवादळाचा तडाखा आता तामिळनाडूच्या किनारपट्टीला बसला आहे. गज चक्रीवादळामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून ८१,००० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत. तामिळनाडूतील किनारी भागामध्ये सध्या १२० किमी प्रतितास वेगानं वारे देखील वाहत आहेत. गजच्या चक्रीवादळामध्ये मृत्यू झालेले ३ जण हे कुड्डालोर जिल्ह्यातील आहेत. सकाळी गज चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे काही ठिकाणी भूसख्खलन देखील झाले. राजधानी चेन्नईपासून गज चक्रीवादळ ३०० कमी अंतरावर येऊन धडकले आहे. सहा जिल्ह्यांमध्ये ३०० रिलिफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. अद्याप तरी चक्रीवादळामुळे कुड्डालोर जिल्ह्यामध्ये वीज अथवा कोणतीही पडझड झाल्याची माहिती हाती आलेली नाही. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन आजच्या दिवशी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर काही परिक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एनडीआरएफच्या ४ टीम सध्या मदतीसाठी तयार असून ९००० लोक सध्या मदतकार्यामध्ये सहभागी झालेले आहेत. दरम्यान, नेव्ही आणि हवाई दल देखील मदतीसाठी सज्ज आहे. गज चक्रीवादळामुळे रेल्वे सेवेवर देखील काही प्रमाणात परिणाम झाला असून चेन्नई ते नागपट्टीणम, थिरूवरकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात अाल्या आहेत. बाधित भागामध्ये मोबाईल सेवेवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत.

वाचा – गाजा चक्रीवादळ: तामिळनाडूच्या १३ जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -