घरदेश-विदेशऔरंगजेब हत्या प्रकरण : 'राष्ट्रीय रायफल्स'चे तीन जवान ताब्यात

औरंगजेब हत्या प्रकरण : ‘राष्ट्रीय रायफल्स’चे तीन जवान ताब्यात

Subscribe

शौर्य चक्र विजेता शहीद जवान औरंगजेबजेच्या हत्येप्रकरणी 'राष्ट्रीय रायफल्स'च्या तीन जवानांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जम्मू – काश्मीरमध्ये जून महिन्यात शौर्य चक्र विजेता शहीद जवान औरंगजेबची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. या हत्येनंतर देशभरात संतापाची लाटही उसळली होती. या हत्येप्रकरणी भारतीय सैन्याने राष्ट्रीय रायफल्सच्या तीन जवानांना ताब्यात घेतले आहे. या तिघांनी औरंगजेबविषयीची माहिती दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवल्याचा संशय असून याप्रकरणी अजूनही चौकशी सुरु असल्याचे सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

औरंगजेबच्या हत्येप्रकरणी तिघांना ताब्यात

औरंगजेबला मरणोत्तर शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले होते. यांच्या हत्येप्रकरणी अबिद वानी, तजमूल अहमद आणि अदिल वानी या तिघांना भारतीय सैन्याच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या तिघांनी औरंगजेबविषयीचा तपशील उघड केल्याचा संशय असून याप्रकरणी अद्याप चौकशी सुरु असल्याचे सैन्यातील सूत्रांनी सांगितले आहे.

- Advertisement -

अहमदच्या कुटुंबाचा आरोप

भारतीय सैन्याच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी अहमदला बेदम मारहाण केल्याचा आरोप अहमदच्या कुटुंबाने केला आहे. ‘पुलवामा येथील राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पमध्ये अहमदला बोलावण्यात आले होते. तिथे अहमदला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला रस्त्यालगच्या एका ठिकाणी सोडून दिले. स्थानिकांनी जखमी अहमदला रुग्णालयात दाखल केले’, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. सध्या अहमदची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर भारतीय सैन्याच्या रडावर असलेल्या तीन जवानांपैकी एक जवान हा कुलगाम येथील आहे तर बाकी दोन जण पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आहे आहे.

औरंगजेबचे अपहरण करून केली हत्या

१४ जुन रोजी २४ वर्षीय औरंगजेब रमजान निमित्त घरी परतत होता. त्यावेळी रस्त्यावरच दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याचा १.१५ मिनिटाचा व्हिडीओ देखील शूट केला. सोशल मीडियावर देखील हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये दहशतवादी औरंगजेबकडे चौकशी करत असल्याचे दिसत आहे. औरंगजेबने देखील त्यांना आपण भारतीय सैन्यामध्ये जवान असल्याचे अभिमानाने सांगितले आहे. चौकशीअंती औरंगजेबची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

- Advertisement -

वाचा – बदले की आग!मित्रासाठी ५० जणांची परदेशातील नोकरीवर लाथ!!

वाचा – प्रेम प्रकरणामुळे औरंगजेब शहीद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -