घरदेश-विदेश३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या?

३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या?

Subscribe

३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुरूग्राममध्ये समोर आला आहे.

३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याचा धक्कदायक प्रकार गुरूग्राममध्ये समोर आला आहे. रविवारी सकाळी खेळताना मुली गायब झाली. त्यानंतर मुलीचा मृतदेह सेक्टर ६६मध्ये बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, घराच्या बाहेर खेळताना मुलीला किडनॅप केल्याचा दावा तिच्या पालकांनी केला आहे. सोमवारी सकाळी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या एका खोलीमध्ये मुलीचा मृतदेह सापडला. त्यानंतर कामगारांनी पोलिसांना त्याची माहिती दिली. पोलिसांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेत, मृतदेह ताब्यात घेतला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर संपूर्ण माहिती समोर येईल अशी माहिती असिस्टंट पोलिस कमिशन समशेर सिंग यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये भादंवि ३७६, ३०२ आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -