घरदेश-विदेशबंद लॉकरमध्ये सापडले ३० कोटी

बंद लॉकरमध्ये सापडले ३० कोटी

Subscribe

मिठाईच्या दुकानातील बसमेंटमध्ये बंद असलेल्या लॉकर्समध्ये तब्बल ३० कोटी रुपयांची रक्कम सापडली आहे. ही रक्कम आयकर विभागाने जप्त केली असून या बेसमेंटमध्ये अधिकारी तळ ठोकून बसले आहेत.

लपवलेल्या लॉकरमध्ये आयकर विभागाला मोठे घबाड सापडलं आहे. या लपवलेल्या १७५ लॉकर्समधून तब्बल ३० कोटींपेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आली असल्याची घटना दिल्लीमध्ये घडली आहे. दिल्लीतील प्रसिद्ध असलेल्या चांदनी चौक बाजार परिसरात हे घबाड सापडले आहे. या रक्कमेची मोजणी सुरु असल्याचे समोर आले आहे. एका मिठाईच्या दुकानाखाली असलेल्या बेसमेंटमध्ये ३०० लपवलेले लॉकर आहेत. त्यापैकी १७५ लॉकर्सच्या करण्यात आलेल्या झडतीमध्ये ३० कोटींची रोकड जप्त केली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

२५ वर्षांपासून होते या ठिकाणी लॉकर

चांदनी चौकातील खारी बावली या मिठाईच्या दुकानातील बेसमेंटमध्ये गेल्या २५ वर्षांपासून हे लॉकर असल्याची माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली आहे. तसेच त्यांचा परवानाही असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काही दिवसांपासून या लॉकरचा व्यवसाय तेजीत सुरु असल्याचे समोर आले असून ३०० लॉकर्सपैकी एकही लॉकर कधीच रिकामी नसल्याची माहिती समोर आली आहे. व्यापाऱ्यांकडील रक्कम चोरी होऊ नये म्हणून ते लॉकरमध्ये ठेवतात. या लॉकर्सच्या सुरक्षितेसाठी या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले असून सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आली आहे.

रक्कम नक्की आहे तरी कुणाची

चांदणी चौक परिसर हा हवाला व्यवसायाचे मुख्य केंद्र म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेली रक्कम नक्की कोणाची आहे. याबाबत अद्याप माहिती मिळालेली नसून आयकर विभागाचे अधिकारी याबाबत शोध घेत आहेत. गेल्या महिन्यापासून आयकर विभागाचे अधिकारी या लॉकरमधील रक्कम मोजत असून या लॉकरचे कनेक्शन थेट दुबईतल्या हवाला किंग पंकज कपूरसोबत असल्याचा संशय आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

वाचा – आयकर परताव्यासाठी आता १५ दिवसांची मुदत वाढ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -