घरदेश-विदेशनवलच! शॉपिंग मॉलमध्ये ३० फुटाचा पंखा

नवलच! शॉपिंग मॉलमध्ये ३० फुटाचा पंखा

Subscribe

३० फुटांची पाती असलेले सहा पंखे मॉलमध्ये असून, एका पंख्यांची किंमत पाच लाख रुपये इतकी आहे.

जगात अशा अनेक दुर्मिळ वस्तू किंवा शिल्प आहेत, जी पाहिल्यावर आपल्या याती निर्मिती कशी झाली असेल? असा प्रश्न पडतो. भारतातही अशा अनेक वस्तू आहेत ज्या सामान्य वस्तूंच्या तुलनेत जरा हटकेच आहेत. हा अजब गजब पंखा त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. टेबल फॅन, सिलींग फॅन किंवा सहसा धार्मिक कार्यालयांमध्ये असतात ते स्टँडी पंखे, असे अनेक प्रकारचे पंखे तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. फॅनचा प्रकार आणि आकार कमी-जास्त असला तरी त्याच्या पात्यांमध्ये फारसा फरक नसतो. साधारण एका ठराविक आकाराचीच ही पाती असतात. मात्र, छत्तीसगडमध्ये असा एक पंखा आहे ज्याच्या पात्यांची लांबी चक्क ३० फूट इतकी आहे. या पंख्याचं एक पातं एक चक्कर पूर्ण करण्यासाठी १५ सेकंद इतका वेळ घेतं, जिथे सामान्य आकाराचं पातं ४ ते ५ सेकंदाचा वेळ घेतं. त्यामुळे या महाकाय पंख्याच्या एका पात्याला चार चक्कर पूर्ण करण्यासाठी १ मिनीटाचा कालावधी लागतो.


वाचा: ‘झुंड’ चित्रपटाचे शूटींग सुरू; फोटो व्हायरल

AC चा खर्च वाचवण्यासाठी ही युक्ती

तब्बल ३० फूटाचं एक पातं अशी चार ते पाच पाती असलेला हा भलामोठा पंखा, एखाद्या पवनचक्की सारखा भासतो.  या पंख्याच्या फिरण्याच्या  मंद गतीमुळे हा किती वारा देणार? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मात्र, या पंख्याचा वारा  कोपर्‍यात बसलेल्या व्यक्‍तीपर्यंतही व्यवस्थित पोहचतो. हा विशाल पंखा छत्तीसगढची राजधानी असलेल्या रायपूरममध्ये आहे. रायपूरमधील विधानसभा रोडवरील डेकाथलॉन स्पोर्टस् मॉलमध्ये हा पंखा पाहायला मिळतो. मॉलचे कर्मचारी प्रशांत राठी सांगतात की, हा पंखा जपानमधून आणण्यात आला आहे. मॉलमध्ये एसीसाठी बराच खर्च होत होता. तो वाचवण्यासाठी हा मोठ्या आकाराचा पंखा आणण्यात आला. ३० फुटांची पाती असलेले असे सहा पंखे मॉलमध्ये आहेत. जे  दहा हजार चौरस फूट जागेत वारा खेळवत ठेवतातय. प्रत्येक पंख्यांची किंमत पाच लाख रुपये इतकी आहे. पाती इतक्या मोठ्या लांबीची असली तरीही त्यांचा आवाज येत नाही. एक हॉर्सपॉवरच्या मोटरच्या सहाय्याने हा पंखा चालवता येतो. पंख्याच्या पात्यांना गंज चढणार नाही, अशा पद्धतीने त्याची निर्मीती करण्यात आली असल्याचं अधिकारी सांगतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -