Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश बालाकोट एअरस्ट्राइकमध्ये ३०० दहशतवाद्यांचा मृत्यू, पाकिस्तानची कबुली

बालाकोट एअरस्ट्राइकमध्ये ३०० दहशतवाद्यांचा मृत्यू, पाकिस्तानची कबुली

पाकिस्तानचा माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलालीने दिली कबुली

Related Story

- Advertisement -

पुलवामा येथे झालेल्या पाकिस्तानच्या भ्याड आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० हून अधिक जवानांनी वीरमरण पत्कारले. त्यानंतर पाकिस्तानच्या हल्ल्याला जोरदार प्रतिउत्तर देत भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील पाकिस्तानच्या दहशतवादी तळावर हल्ला चढवला. परंतु या हल्ल्यात पाकिस्तानचा एकही नागरिक मारला गेला नसल्याचा कांगावा पाकिस्तानकडून करण्यात आला. त्यामुळे नेमके किती दहशवादी मेले याची ठोस आकडेवारी अद्यापही समोर आलेली नव्हती. परंतु या हल्ल्याला दोन वर्षे उलटल्यानंतर एका पाकिस्तानच्या माजी अधिकाऱ्याने बालाकोटमध्ये मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांची खरी आकडेवारी स्पष्ट केली आहे.

भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ३०० लोक मारले गेल्याची कबुली पाकिस्तानचा माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी एका टीव्ही शोमध्ये दिली आहे. २६ फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या एअरस्ट्राइकमध्ये ३०० दहशतवादी मारले गेल्याचे त्यांनी या शोमध्ये मान्य केले. यावेळी बोलनताना आगा हिलाली म्हणाले, भारताने आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे झेपावत युद्धसदृश कारवाई केली होती. यामध्ये किमान ३०० जण मारले गेल्याचे वृत्त होते. मात्र आमचे लक्ष्य वेगळे आहे. आम्ही त्यांच्या हायकमांडना लक्ष्य करतो. तेच आमचे अचूक लक्ष्य आहे. तेव्हा आम्ही सांगितले होते की, सर्जिकल स्ट्राइकमध्ये कुणाचाही मृत्यू झालेला नाही. आता आम्ही सांगितले की, ते जे काही करतील त्याला आम्हीसुद्धा त्याच स्तरावर उत्तर देऊ.

- Advertisement -

आगा हिलाली हे अनेक वृत्तवाहिन्याच्या चर्चा सत्रात भाग घेत छुप्या कुरघोडी करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याची बाजू घेत असतात. मात्र यावेळी त्यांनी भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याने पाकिस्तानवर ओढवलेल्या नामुष्कीची कबुली दिली स्वत;च्या तोंडानी दिली आहे. खैबर पख्तुनख्या प्रांतातील बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ आहे. भारतीय हवाई दलाने या तळाला लक्ष्य केले होते. मात्र त्यावेळी आपला बचाव करण्यासाठी पाकिस्तानने या तळावर कुणी उपस्थित नसल्याचा दावा केला होता. त्यामुळे भारतायांमध्येही या एअरस्ट्राइकमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आकड्याबाबत शंका निर्माण होत होती.

 


हेही वाचा – भारतीय महिला वैमानिक घालणार विश्वविक्रमाला गवसणी


- Advertisement -

 

- Advertisement -