घरदेश-विदेशइंडोनेशियामध्ये बोट उलटली; ३४ प्रवाशांचा मृत्यू तर ३१ बेपत्ता

इंडोनेशियामध्ये बोट उलटली; ३४ प्रवाशांचा मृत्यू तर ३१ बेपत्ता

Subscribe

इंडोनेशियामध्ये प्रवासी बोट उलटली. गेल्या दोन आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. तटरक्षक दलाकडून बचावकार्य सुरु आहे.

इंडोनेशियामध्ये बोट उलटून झालेल्या दुर्घटनेमध्ये ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३१ प्रवासी बेपत्ता आहे. आतापर्यंत ७४ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. या बोटीमधून १४० नागरिक प्रवास करत होते. तसच जवळपास १२ वाहनांना या बोटीमधून घेऊन जात होते. बोट उलटण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

इंडोनेशियामध्ये सुलावेसी केएम लेस्तरी नावाची बोट समुद्रात उलटली. घटनेवेळी ही बोट समुद्र किनाऱ्यापासून ३०० मीटर अंतरावर होती. बोट बुडाल्यानंतर काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. तर काही प्रवाशांनी बुडालेल्या बोटीच्या उर्वरीत भागाला लटकून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेमध्ये ३४ लोकांचा मृत्यू जाला तर ३१ जण बेपत्ता झालेत. स्थानिक नागरिक आणि तट रक्षकांच्या मदतीने ७४ लोकांना वाचवण्यात यश आले आहे.

- Advertisement -

गेल्या दोन आठवड्यामधील इंडोनेशियामधील ही दुसरी घटना आहे. १८ जूनला सुमात्रामध्ये एक बोट बेपत्ता झाला होती. या बोटीमध्ये १६० नागरिक प्रवास करत होते. या बोटीसाठी सरकारकडून सुरु असलेल्या शोध मोहिमेला थांबवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -