घरCORONA UPDATEनिजामुद्दीन मरकजप्रकरण: पिंपरी-चिंचवडमधील ३२ जणांचा सहभाग, कोरोनाग्रस्तांची संख्या वाढणार?

निजामुद्दीन मरकजप्रकरण: पिंपरी-चिंचवडमधील ३२ जणांचा सहभाग, कोरोनाग्रस्तांची संख्या वाढणार?

Subscribe

१५ जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.उर्वरीत लोकांना लवकरच क्वारंटाईन करण्यात येईल.

राजधानी दिल्लीत निजामुद्दीन दर्ग्यावर झालेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या जम्मू – काश्मिरच्या लोकांचा शोध घेतला जात आहे. सरकारने अशा ८५५ लोकांची यादी बनवली आहे, जे या कार्यक्रमात सहभागी होते तसेच यामध्ये सहभागी असलेल्यांच्या संपर्कात होते. तर जम्मूमध्ये अशा ६ जणांना क्वारंटाइनदेखील करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडमधील एकूण ३२ जणांनी सहभाग नोंदवला होता. त्या पैकी १५ जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. उर्वरित व्यक्तींचा शोध घेतला गेला. हे १० ते १५ जण पिंपरी-चिंचवड शहरातील असल्याची माहिती समोर आली असून त्यांना महानगर पालिकेच्या रुग्णालयात क्वारंटइन करण्यात आलं आहे अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलीस आणि महानगर पालिका प्रशासनाने दिली आहे.

एकूण ५० पानांच्या यादीमध्ये जम्मूतील ८३ लोकांचा समावेश असून उर्वरित लोकं ही काश्मिरमधील आहेत. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या बहुतांश लोकांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समजल्यानंतर परिसरात एकच गदारोळ माजला. कार्यक्रमातून परतलेल्या जम्मू-काश्मिरमधील सर्वाधिक नागरिकांनी त्यांचा प्रवास इतिहास लपवला असून सध्या विविध भागांमध्ये ते राहत आहेत. या सर्वांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाइन करण्याची मोहिम युद्धपातळीवर सरकार करत आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

दिल्लीमधील निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातीने धार्मिक कार्यक्रम आयोजित केला होता. यात शेकडो जण विविध शहरातून येऊन सहभागी झाले होते. यात एकाच इमारतीतील २४ जणांना करोनाची बाधा (पॉझिटिव्ह) असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, सहभागी झालेल्या सहा जणांचा तेलंगणामध्ये मृत्यू झाला आहे. दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात तबलीगी मरकज प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आता कारवाई केली असून येथील धार्मिक सभा आयोजित करणाऱ्या मौलानाला ताब्यात घेतले आहे. या मौलानावर भारतीय दंड विधान कायद्यानुसार कलम २६९, २७०, २७१, १२० ब च्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. काही वेळापुर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला होता. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश देताना त्यांनी उपराज्यपाल यांना कारवाई संदर्भातली फाईल पाठवली होती. त्यानंतर लगेचच उपराज्यपाल यांनी पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.


हे ही वाचा – निजामुद्दीन मरकजप्रकरण: काश्मिरमधील ८५५ लोकांची यादी; जम्मूतील ६ जण क्वारंटाइन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -