घरदेश-विदेशनागरीकांना दिलासा; ३३ वस्तूंवरील जीएसटी दर घटवला

नागरीकांना दिलासा; ३३ वस्तूंवरील जीएसटी दर घटवला

Subscribe

बहुतांश वस्तूंवरील कर १८ टक्क्यांखाली आणण्याची घोषणा नुकतीच केंद्र सरकारने केली होती. यामुळे शनिवारी होणाऱ्या जीएसटी काऊंन्सिलच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

बहुतांश वस्तूंवरील कर १८ टक्क्यांखाली आणण्याची घोषणा नुकतीच केंद्र सरकारने केली होती. यामुळे आज, शनिवारी होणाऱ्या जीएसटी काऊंन्सिलच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीमध्ये ३३ वस्तुंवरील जीएसटी दर घटविण्यात आल्याची माहिती पद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांनी सांगितले. या वस्तूंवर २८, १८ आणि १२ या श्रेणीमध्ये कर वसूल केला जात होता. काँग्रेसच्या मागणीनुसार लग्झरी वस्तूंना सोडून अन्य वस्तू १८ टक्क्यांच्या करकक्षेत आणण्यात यावे. हे सरकारनेही मान्य केले आहे. केवळ ३४ वस्तू सोडून उर्वरित वस्तूंना १८ किंवा त्यापेक्ष कमी करकक्षेत ठेवण्यात आल्याचे नारायणसामी यांनी सांगितले.

वाचा : जीएसटीमुळे पशुखाद्य उत्पादक अडचणीत!

- Advertisement -


अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

शनिवारी सकाळी दिल्लीतील विज्ञान भवनात जीएसटी परिषदेची बैठक सुरु झाली. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या परिषदेचे अध्यक्षपद भुषविले. ही जीएसटीची ३१ वी बैठक होती. आज २८ टक्के कर असलेल्या ३९ वस्तूंपैकी ती घटवून ३४ करण्यात आली आहे. म्हमजेच ५ वस्तूंवर १८ टक्के कर लावण्यात आला आहे. तसेच हायब्रिड कारवरील करही २८ टक्क्यांवरून १८ टक्के आणण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

वाचा : घ्या, जीएसटीच्या जाहिरातींवर १३२ कोटींचा खर्च!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -