घरदेश-विदेशमजुरांची तीन वर्षांची कमाई मुकेश अंबानी एका सेकंदात कमवतात

मजुरांची तीन वर्षांची कमाई मुकेश अंबानी एका सेकंदात कमवतात

Subscribe

नॉन प्रॉफिट ग्रुप Oxfam ने सादर केला रिपोर्ट

कोरोना विषाणुच्या विळख्या सारे जग भरडले गेले. लॉकडाऊनमुळे अनेक देशांवर आर्थिक संकट उभे राहिले. परंतु आता परिस्थिती आटोक्यात येत असताना गरीब आणि श्रीमंत यांच्यातील भीषण वास्तव समोर येत आहे. कारण या परिस्थित भारतातील गरीब आणखी गरीब झाला आणि श्रीमंत आणखी श्रीमंत झाल्याचा एक रिपोर्ट नॉन प्रॉफिट ग्रुप Oxfam ने सादर केला आहे. The Inequality Virus नावाने सादर केलेल्या या रिपोर्टनुसार, कोरोनामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भारतातील अब्जाधीशाच्या संपत्तीत ३५ टक्क्यांनी वाढ झाली तर दुसरीकडे देशातील ८४ टक्के कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. एकट्या एप्रिलमध्ये प्रत्येक तासाला १.७ लाख भारतीयांच्या नोकऱ्या गेल्या, तर मार्च २०२० मध्ये भारतातील १०० अब्जाधिशांनी जितकी संपत्ती कमावली आहे तितक्या संपत्तीमध्ये देशातील १३.८ कोटी गरीब नागरिकांना ९४,०४५ रुपये दिले जाऊ शकतात. Oxfam च्या रिपोर्टनुसार देशातील गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

रिपोर्टनुसार, भारतातमध्ये वाढणारी आर्थिक असमानता एक भीषण कडवे सत्य आहे. कोरोना महामारीमुळे  रिलायन्स इंडस्ट्रिचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची एका तासात जितकी संपत्ती कमावतात ती कमवण्यासाठी देशातील अकुशल कामगारांना १०,००० वर्षे लागतील, तसेच मुकेश अंबानींची एक सेकंदाची कमाई कमावण्यासाठी ३ वर्षे लागतील, मागील २०२० मधील ऑगस्ट महिन्याच्या आकडेवारीनुसार जगातील श्रीमंत व्यक्तीमध्ये मुकेश अंबानी चौथ्या स्थानी आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने अनेक गरीब कुटुंबाचे हाल झाले. लाखो प्रवासी मजुरांचा हातचा रोजगार गेला, कोरोनाच्या भीतीने अनेक मजुरांना गरीबीमुळे लाखो मैल पायी प्रवास करणे भाग पडले. या काळातील काळीज पिळवटून टाकणारे हजारो फोटो व्हायरल होत होते. परंतु जर गरीब असाच गरीब राहिला आणि श्रीमंत अधिक श्रीमंत झाला. तर देशात महाईचे संकट पुन्हा सुरु होईल आणि याची पहिली झळ गरीबाला भोगावी लागेल.

- Advertisement -

हेही वाचा – दिल्लीत तणाव, शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -