घरCORONA UPDATEगेल्या २४ तासात बीएसएफचे ३६, तर आयटीबीपीचे १८ जवान कोरोना पॉझिटिव्ह

गेल्या २४ तासात बीएसएफचे ३६, तर आयटीबीपीचे १८ जवान कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

आतापर्यंत ८१७ जवान बरे झाले आहेत.

बीएसएफ जवानांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गेल्या २४ तासांत सीम सुरक्षा दलाच्या ३६ जवानांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर ३३ जवान बरे झाले आहेत. सीमा सुरक्षा दलाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, सध्या बीएसएफमध्ये ५२६ जवानांवर उपचार सुरु आहेत तर ८१७ जवान बरे झाले आहेत.

- Advertisement -

आयटीबीपीचे १८ जवान कोरोना पॉझिटिव्ह

मागील २४ तासांमध्ये इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दलातील १८ जवान आज कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या ‘आयटीबीपी’च्या १५१ जवानांवर उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत २७० जवानांनी करोनावर मात केलेली आहे. यामुळे गेल्या २४ तासांत ५४ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, देशातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात आतापर्यंतची कोरोनाबाधित आकड्यातील सर्वात मोठी वाढ झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक २४ हजार ८५० नव्या रुग्णांचची नोंद झाली आहे. तर ६१४ जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ६ लाख ७३ हजार १६५ वर पोहोचला असून यापैकी १९ हजार २६८ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४ लाख ९ हजार ८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या २ लाख ४४ हजार ८१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य व कुटुंब मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तीन दिवसाच्या आतच मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द 


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -