राजस्थानात सरकारी शाळेत मध्यान्ह भोजनातून ३६ मुलांना विषबाधा

मध्यान्ह भोजनातील पदार्थ खाल्ल्याने विद्यार्थ्यांची प्रकृतीत बिघाड

Rajasthan

राजस्थान मधील भिलवाडा जिल्ह्यातील जाबरकिया खेड्यात सरकारी माध्यमिक शाळेत विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी सरकारी माध्यमिक शाळेमध्ये ३६ मुलांना विषबाधा झाली. या विद्यार्थांना मध्यान्ह भोजनात कढी-भात देण्यात आला होता तो मुलांनी खाल्ल्याने त्यांची तब्ब्येत अचानक बिघडली. मध्यान्ह भोजनातील पदार्थ खाल्ल्याने त्यांची तब्ब्येत बिघडल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मध्यान्ह भोजनात दूषित कढी भात दिल्याचा आरोप

राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील जाबरकिया खेड्यातील एका सरकारी माध्यामिक शाळेतील ३६ मुलांना विषबाधा झाली आहे. मध्यान्ह भोजनात देण्यात आलेला कढी-भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्या होऊ लागल्या. येथील विद्यार्थांना मध्यान्ह भोजनात देण्यात आलेला कढी भात हा दूषित असल्याचा आरोप या शाळेवर होत असून, या प्रकरणाची अधिक चौकशी करून दोषींवर कारवाई लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात येईल, असे करोई पोलीस ठाण्याचे प्रभारी मुकेश कुमार वर्मा यांनी यावेळी सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here